प्राथमिक मुख्याध्यापकांचा अपडेट होण्यास नकार
By admin | Published: June 25, 2017 12:22 AM2017-06-25T00:22:12+5:302017-06-25T00:22:12+5:30
शिक्षण क्षेत्रात सतत नवे बदल होत आहे. त्यानुसार शिक्षक संचालक शाळांनाही अपडेट होण्याच्या सूचना सतत करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शिक्षण क्षेत्रात सतत नवे बदल होत आहे. त्यानुसार शिक्षक संचालक शाळांनाही अपडेट होण्याच्या सूचना सतत करीत आहे. मात्र जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक जुन्या पद्धती सोडण्यास तयार नाही.
सर्व शाळांमध्ये एकसुत्रता येण्यासाठी शिक्षण संचालकांनी सत्र २०१६-१७ पासून शाळा सोडल्याचा दाखला व दाखल खारिज रजीस्टर याचा नमुना बदलविला. नव्या नमुन्यात शाळेचा युडायस क्रमांक, विद्यार्थ्यांचा आयडी क्रमाक, जन्मस्थळ या बाबींचा समावेश असण्याची सक्ती केली. मात्र वणी तालुक्यातील काही प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक अजूनही जुन्याच दाखल्यांचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांकडे विद्यार्थ्यांचे आयडी क्रमांक व आधार कार्ड नंबर उपलब्ध नसल्याने त्याची नोंद शाळा सोडल्याच्या दाखल्यावर घेण्यास नकार देत आहे. शिरपूर व मेंढोली येथील पालकांनी मागणी करूनही त्यांना नव्या स्वरूपातील सर्व नोंदी असणारे दाखले दिले जात आहे. त्यामुळे पालक संताप व्यक्त करीत आहे.