‘एसटी’च्या विभाग नियंत्रकांची चौकशी
By admin | Published: November 15, 2015 01:46 AM2015-11-15T01:46:07+5:302015-11-15T01:46:07+5:30
कामगारांसाठी कायदा सांगणाऱ्या यवतमाळ विभाग नियंत्रकांनी केलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश ...
अहवाल मागितला : रजा मंजुरीशिवाय वेतन
यवतमाळ : कामगारांसाठी कायदा सांगणाऱ्या यवतमाळ विभाग नियंत्रकांनी केलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापकांनी दिले आहे. प्रादेशिक व्यवस्थापकांनी ही चौकशी करून अहवाल सादर करावा, असे कळविले आहे.
विभाग नियंत्रक शिवाजी मधुकर जगताप यांनी रजा मंजूर नसतानाही वेतन उचलले होते. वास्तविक ही बाब बेकायदेशीर आहे. शिवाय कामगारांसाठी त्याची अंमलबजावणीही केली जाते. मात्र शिवाजी जगताप यांनी या सर्व बाबी टाळून वेतन उचलले. या प्रकाराची तक्रार येथील सुभाष राजाराम श्रीवास यांनी वरिष्ठांकडे केली होती. याची दखल घेण्यात आली. उपमहाव्यवस्थापकांनी २६ आॅक्टोबरच्या पत्रानुसार चौकशीचे आदेश अमरावती प्रादेशिक व्यवस्थापकांना दिले आहे. (वार्ताहर)