महिनाभरापूर्वीच करता येणार वाहनांचे नूतनीकरण

By Admin | Published: April 14, 2017 02:34 AM2017-04-14T02:34:54+5:302017-04-14T02:34:54+5:30

वाहनांच्या फिटनेस नूतनीकरणासाठी वाहनधारकांना आता ताटकळत राहण्याची गरज नाही.

Renewal of vehicles that can be done just before month | महिनाभरापूर्वीच करता येणार वाहनांचे नूतनीकरण

महिनाभरापूर्वीच करता येणार वाहनांचे नूतनीकरण

googlenewsNext

आरटीओत सुविधा : वाहनधारकांना दिलासा
यवतमाळ : वाहनांच्या फिटनेस नूतनीकरणासाठी वाहनधारकांना आता ताटकळत राहण्याची गरज नाही. त्यांना महिनाभरापूर्वीच फिटनेस प्रमाणपत्र मिळण्याची सोय येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे.
परिवहन विभागाला वाहनाच्या फिटनेस परवाना नूतनीकरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५० मीटर लांबीच्या ट्रॅकची सक्ती केली. त्यानुसार एमआयडीसी लोहारा येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत वाहन परवान्यासाठी वाहनांची ट्रायल घेतली जाते. तेथेच वाहनांच्या प्रकारानुसार योग्यता प्रमाणपत्र तपासणी कार्यालयीन वेळेत होते. यासाठी वाहनधारकाने विधीग्राह्य कागदपत्र ज्यात नोंदणी प्रमाणपत्र, विमा, कर, वायू प्रदूषण प्रमाणपत्र, परवाना, व्यवसाय कर, पर्यावरण कर सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्र व वाहनात त्रृटी आढळल्यास वाहनाची तपासणी केली जात नाही. त्यामुळे वाहनधारकांना वाहन परत घेऊन जावे लागत होते.
ही गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी महिनाभरापूर्वीच परवाना नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी केले. यात एकाच दिवशी ४० वाहनांना नूतनीकरणासाठी अपॉईमेंट घेता येणार आहे. त्यामुळे नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वाहनांची इन कॅमेरा तपासणी करून परवाना नूतनीकरण केले जात आहे. यामुळे जिल्हाभरातील मोठ्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Renewal of vehicles that can be done just before month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.