सौर ऊर्जेसाठी शेती भाड्याने द्या अन् मिळवा 30 हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 10:54 PM2022-11-08T22:54:05+5:302022-11-08T22:55:18+5:30

आता शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. तसेच सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावापासून कायमचा सुटकारा मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनी संपूर्ण भार उचलणार आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना करार पद्धतीने शेतजमीन द्यावी लागणार आहे. त्याचा मोबदलाही मिळणार आहे.

Rent farm for solar energy and earn 30 thousand rupees | सौर ऊर्जेसाठी शेती भाड्याने द्या अन् मिळवा 30 हजार रुपये

सौर ऊर्जेसाठी शेती भाड्याने द्या अन् मिळवा 30 हजार रुपये

googlenewsNext

ज्ञानेश्वर ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता शेतकऱ्यांची पडीक जमीन वाया जाणार नाही. कारण तुम्ही सौर ऊर्जेसाठी शेती भाड्याने देऊन वार्षिक ३० हजार रुपये कमवू शकता. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असा शासनाचा विचार आहे. या योजनेअंतर्गत सौर कृषिपंप बसविला जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. तसेच सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावापासून कायमचा सुटकारा मिळणार आहे. 
या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनी संपूर्ण भार उचलणार आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना करार पद्धतीने शेतजमीन द्यावी लागणार आहे. त्याचा मोबदलाही मिळणार आहे.

काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना? 
महावितरणच्या उपकेंद्रापासून पाच किलोमीटर अंतरात शेतजमिनीवर सोलर प्लेट उभारून दरदिवशी दोन मेगावॅट निर्मितीचा हा प्रकल्प आहे. ही वीज शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यातून गावोगावी वीज पुरवठा होईल. यासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

महागावात अद्याप लाभार्थी नाही
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेसंदर्भात महागाव तालुक्यातील शेतकरी अनभिज्ञ आहे. या तालुक्यातील एकाही शेतकऱ्याने लाभ घेतला नाही. 
- शेती रस्त्याला लागून असणे आणि उपकेंद्र त्या ठिकाणापासून जवळ असणे गरजेचे आहे. या प्रमुख अटीमुळे अनेकांना सहभाग नोंदविता आला नाही.

किमान तीन एकरापासून ५० एकरापर्यंत
- आपली पडीक जमीन सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी तीन एकरापासून ते ५० एकरांपर्यंत भाडेतत्त्वावर देता येईल, अशी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी योजना तयार केलेली आहे. जमीन देणारे खासगी व्यक्ती अथवा संस्थांना वार्षिक भाडे देणार आहे. 

 

Web Title: Rent farm for solar energy and earn 30 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.