पुनर्रोपित वृक्षाला फुटली पालवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:16 PM2018-04-20T23:16:56+5:302018-04-20T23:16:56+5:30

धामणगाव मार्गाच्या रुंदीकरणात तोडलेल्या झाडांपैकी १७ झाडांचे जांब फॉरेस्ट पार्कमध्ये पुनर्रोपण करण्यात आले होते. त्यापैकी एका कडूनिंबाच्या वृक्षाला आता पालवी फुटली आहे.

Replaced tree breaks down | पुनर्रोपित वृक्षाला फुटली पालवी

पुनर्रोपित वृक्षाला फुटली पालवी

googlenewsNext
ठळक मुद्देजांब फॉरेस्ट पार्क : धामणगाव मार्गावरील वृक्षांचे रिप्लॅन्टेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : धामणगाव मार्गाच्या रुंदीकरणात तोडलेल्या झाडांपैकी १७ झाडांचे जांब फॉरेस्ट पार्कमध्ये पुनर्रोपण करण्यात आले होते. त्यापैकी एका कडूनिंबाच्या वृक्षाला आता पालवी फुटली आहे. योग्य देखभाल झाली असती तर सर्वच वृक्षांचे रिप्लॅन्टेशन शक्य झाले असते.
यवतमाळ शहरात सध्या मोठ्या प्रमाणात रस्ता निर्मितीचे काम सुरू आहे. यवतमाळ-धामणगाव मार्गाचे रुंदीकरणही होत आहे. या मार्गावर ब्रिटीश काळापासून गर्द सावली देणारे कडूनिंबाची शेकडो झाडे आहे. स्टेट बँक चौकापासून मोहा फाट्यापर्यंत गर्द सावळी या झाडांमुळे राहत होती. परंतु रस्त्याच्या रुंदीकरणात पहिली कुऱ्हाड चालली ती या गर्द हिरव्याकंच कडूनिंबांवर. वृक्ष तोडण्याची वेळ आली तेव्हा पर्यावरणाचा प्रश्न पुढे आला. त्यातून या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचे ठरले. झाडांना मुळासह उखडून जांब मार्गावरील फॉरेस्ट पार्कमध्ये लावण्याचा निर्णय घेण्यात आला. वृक्षांची शास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपण करण्याचे निश्चित झाले. मशीनच्या सहाय्याने विशाल वृक्ष उचलून तो जांब फॉरेस्ट पार्कमध्ये लावण्याचे ठरले. १७ वृक्ष जांबच्या फॉरेस्ट पार्कमध्ये पोहोचले. त्या ठिकाणी पुनर्रोपण करण्यात आले. या १७ वृक्षांपैकी आता केवळ एकाच वृक्षाला पालवी फुटली. इतर वृक्षांना पालवीची प्रतीक्षा आहे.
दुसरीकडे धामणगाव मार्गावर प्रचंड वृक्षतोड झाल्याने परिसर ओसाड झाला आहे. नवीन माणूस आल्यास त्याला धामणगाव मार्ग ओळखणेही कठीण झाले आहे. तळपत्या उन्हात जाताना प्रत्येकाला आता त्या गर्द सावळी देणाऱ्या कडूनिंबाची आठवण येत आहे.

Web Title: Replaced tree breaks down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.