ं‘मेडिकल’च्या सात विभागप्रमुखांची बदली
By admin | Published: July 5, 2015 02:25 AM2015-07-05T02:25:35+5:302015-07-05T02:25:35+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक,
पाच सहयोगी प्राध्यापक : पाच डॉॅक्टर रूजू झालेच नाही
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीने रिक्त झालेल्या पाच जागेवर अद्यापही नव्याने बदलून आलेले डॉक्टर रुजू झाले नाही.
महाविद्यालयातील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. एस.एस. मोरे हे नांदेड येथे बदलून गेले. त्यांच्या जागेवर नांदेड येथील डॉॅ.मिलिंद कांबळे रुजू झाले आहेत. औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.सी. मेहता यांच्या जागेवर नागपूर येथील डॉ. सुजाता दुधगावकर बदलून आल्या आहेत. पीएसएम विभागाला बरेच दिवसानंतर विभाग प्रमुख लाभले आहे. येथे डॉ. पी.ए. हिवरकर रुजू झाले आहेत. क्ष-किरण विभागातील डॉ. एस.एन. सातघरे यांच्या जागेवर अकोला येथील डॉ. अरुणा पवार आल्या आहेत. मायक्रोबायोलॉजी विभागात डॉ. व्ही.जे. काटकर यांच्या जागेवर डॉ. एन.जी. देवगडे आले आहेत. मात्र अजूनही डॉ. एस. आर थोरात यांच्या बदलीमुळे रिक्त झालेले अस्थिव्यंगोपचार विभागातील जागा रिक्त आहे. तेथे डॉ. मारोती लिंगावार यांची बदली झाली आहे. परंतु ते अद्याप रुजू झाले नाहीत. त्वचारोग विभागातील डॉ. आर.बी चव्हाण यांच्या रिक्त जागेवर कोणालाच देण्यात आले नाही. याप्रमाणेच सहयोगी प्राध्यापक डॉ. एन.डी. बालाणी, ए.व्ही. गावंडे, मो. इब्राहीम, डॉ. रत्ना डांगे, डॉ. किशोर इंगोले याची बदली झाली आहे. यापैकी केवळ पीएसएम विभागात डॉ. एस.एम भिलकर आणि मायक्रोबायोलॉजी विभागात डॉ. विवेक गुजर रुजू झाले आहेत. सहायोगी प्राध्यापकांच्या अजूनही तीन जागा रिक्त आहे.
शिवाय सहायक प्राध्यापक डॉ. शरद कुचेवार यांच्या बदलीने न्याय वैद्यकशास्त्र विभागातील रिक्त झालेल्या जागेवर कुणालाच देण्यात आले नाही. त्यामुळे महाविद्यालयातील २१ विभागापैकी जवळपास सात विभागात मोठी पदे रिक्त आहेत. यावर तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)