पुसद शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:00 PM2018-11-01T22:00:47+5:302018-11-01T22:02:01+5:30

राज्य शासनाने पुसद तालुक्यात दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

Representation to the District Collector of Pusad Shivsena | पुसद शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुसद शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next
ठळक मुद्देदुष्काळ घोषित करा : आंदोलनाचा इशारा,

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : राज्य शासनाने पुसद तालुक्यात दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
शासनाने दुष्काळाच्या यादीतून पुसद तालुक्याला वगळले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. पुसद तालुक्याची नजर आणेवारी ५३ टक्के दर्शविण्यात आली. ही आणेवारी वस्तुनिष्ठ नसून चुकीची असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याचा शहर व तालुका शिवसेनेने निषेध केला आहे.
सुरुवातीला तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र नंतर दोन महिने दडी मारल्याने पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. कापूस, सोयाबीन, तूर पिकांचा उतारा केवळ २५ टक्क्यांवर आला. कापूस पहिल्या वेचणीतच संपत आहे. सोयाबीनचा उताराही प्रतिएकरी दोन ते चार क्विंटल आला आहे. त्यानंतर हमीदरात या शेतमालाची खरेदी केली जात नाही. शासकीय खरेदीला अद्याप सुरुवात झाली नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी पुसद तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देताना पुसद विधानसभा सहसंपर्क प्रमुख अ‍ॅड.उमाकांत पापीनवार, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साकला, तालुका प्रमुख दीपक काळे, शहर प्रमुख संतोष दरणे, रवी पांडे, परेश देशमुख, दीपक उखळकर, उत्तम खंदारे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Representation to the District Collector of Pusad Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.