बसपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By Admin | Published: July 26, 2016 12:08 AM2016-07-26T00:08:22+5:302016-07-26T00:08:22+5:30

उत्तर प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात यावे,...

Request for BSP District Collector | बसपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बसपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

googlenewsNext

धरणे : उत्तरप्रदेश भाजपा उपाध्यक्षांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी
यवतमाळ : उत्तर प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बसपाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
बहन मायावती यांना अपशब्द बोलणाऱ्या दयाशंकर सिंह आणि त्याचा पक्ष घेऊन बोलणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उद््ध्वस्त केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर कारवाई करण्यात यावी. गुजरातमध्ये उना प्रकरणात दलित युवकांना कपडे काढून मारहाण केल्या प्रकरणी गुजरात सरकारवर कारवाई करण्यात यावी.
भाजपा शासित राज्यांत दलित व मुस्लिमांवर वाढत्या अत्याचारांना लगाम लावण्यात यावा यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे देण्यात आले. यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष तारिक लोखंडवाला, पंडित दिघाडे, लक्ष्मण पाटील, प्रफुल्ल शंभरकर, बळीराम नेवारे, या. वा. तलवारे, सुनिल बोरकर, शैलेश गाडेकर, संजय तरवडे, प्रशांत दुधे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

Web Title: Request for BSP District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.