सुवर्णकार समाजाचे कलेक्टरला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:23 PM2017-09-27T23:23:09+5:302017-09-27T23:23:23+5:30

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथील सुवर्णकार समाजाच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाला होता.

Request to the collector of gold jeweler community | सुवर्णकार समाजाचे कलेक्टरला निवेदन

सुवर्णकार समाजाचे कलेक्टरला निवेदन

Next
ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : अत्याचारी नराधमावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथील सुवर्णकार समाजाच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणातील नराधमाला कठोर शिक्षा होण्यासह पीडित तरुणीचे पुनर्वसन व्हावे, यासाठी अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास आणि शोध संस्थानसह इतर सुवर्णकार संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
पाच दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर त्या तरुणीवर विकास मदन देवकते या नराधमाने अत्याचार केला. याच्या निषेधार्थ अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास आणि शोध संस्थान, अखिल माळवी सोनार महासंघ, अखिल भारतीय सोनार फेडरेशन, सोनार व्यापारी मंडळ, वैश्य सोनार संघटना, पांचाळ सोनार समाज मंडळ, कनक कांचन महिला मंडळ, अखिल माळवी महिला समाज मंडळ यांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाकिारी डॉ. राजेश देशमुख यांना सुवर्णकार समाजाच्या सर्व शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी डॉ. एल. टी. पाचकवडे, मारोती एलगंदेलवार, सीमा बिन्नोड, प्रिती गोगटे, डॉ. विद्या पाचकवडे, प्रशांत गोडे, सोनार फेडरेशनचे जिल्हा समन्वयक संदीप खडेकर, जगदिश माळवी, पुरुषोत्तम खडेकर, सुभाष तळोकर, प्रशांत झरकर, प्रशांत सावळकर, डॉ. अविनाश पाचकवडे, मंगेश खुणे, संतोष रत्नपारखी, चित्रा सावळकर, चारुलता पावशेकर, मीना बिन्नोड, माधवी तिनखेडे, मीना देवगीरकर, दिनेश पाचकवडे, संजय साहेबराव लोंदे, राजू मांडळे, प्रकाश माथने, किशोर लोंदे, दर्शन मंडकमाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Request to the collector of gold jeweler community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.