अनावश्यक फलक हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:57+5:302021-09-17T04:49:57+5:30

खर्याच्या पन्न्यांचा सर्रास वापर पांढरकवडा : शहरात खर्रा घोटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पन्न्यांचा वापर वाढला आहे. यामुळे पर्यावरणास धोका निर्माण ...

Request to delete unnecessary panels | अनावश्यक फलक हटविण्याची मागणी

अनावश्यक फलक हटविण्याची मागणी

Next

खर्याच्या पन्न्यांचा सर्रास वापर

पांढरकवडा : शहरात खर्रा घोटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पन्न्यांचा वापर वाढला आहे. यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होत आहे, तसेच अनेक जनावरेसुद्धा या पन्न्या खात असल्याने त्यांचेही जीवन धोक्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी चौकाचौकांत या पन्न्यांचे ढीग आढळून येतात. त्यामुळे नगरपालिकेच्या पथकाने याकडे लक्ष देऊन पन्न्या वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ग्रामीण रुग्णालयासमोरील रस्ता दयनीय

वणी : शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, या रुग्णालयात ये- जा करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. थोडा जरी पाऊस आला तरी या रुग्णालयासमोर पाण्याचे डबके साचते. त्यामुळे तेथून मार्ग कसा काढावा, असा प्रश्न पडतो. अनेकांना कसरत करत तेथून मार्गक्रमण करावे लागते.

Web Title: Request to delete unnecessary panels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.