बिरसा ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 09:43 PM2018-03-26T21:43:14+5:302018-03-26T21:43:14+5:30
वर्धा जिल्ह्यातील आदिवासी युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा ब्रिगेडने केली आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : वर्धा जिल्ह्यातील आदिवासी युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा ब्रिगेडने केली आहे.
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात काही नराधमांनी १९ वर्षीय आदिवासी युवतीवर अत्याचार करून तिची हत्या केली. तिचा नग्न आणि छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह धपकी शिवारात टाकून दिला. मात्र अद्याप तेथील पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. समाजातील विविध संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे.
या प्रकरणी बिरसा ब्रिगेडने एल्गार पुकारून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अत्याचाºयांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा राज्यभर एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा बिरसा ब्रिगेडने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना बिरसा ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, जिल्हा सचिव नीलेश पंधरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष मोतिश सिडाम यांच्यासह नागेश कुमरे, जगदीश मडावी, आशीष भिसे, अमोल मडावी, राहुल सोयाम, रवींद्र किनाके, विनोद आत्राम, रामदास भिसे, अनिल आत्राम, नीलेश पिंपरे, गणेश सलाम, योगेश मिसळे, सपना आत्राम, शुभांगी पेंदोर, पायल राजगडकर, वंदना कनाके आदींसह जिलह्यातील शमाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.