पारधी समाजातील महिलांचे दारूबंदीसाठी नेर येथे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:23 PM2019-07-26T23:23:28+5:302019-07-26T23:24:18+5:30
दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहे, भांडण-तंटे वाढले आहे. यामुळे दारू विक्री थांबविण्यात यावी, अशी विनंती पारधी समाजातील महिलांनी पोलिसांना केली आहे. यासंदर्भात ठाणेदार पितांबर जाधव यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहे, भांडण-तंटे वाढले आहे. यामुळे दारू विक्री थांबविण्यात यावी, अशी विनंती पारधी समाजातील महिलांनी पोलिसांना केली आहे. यासंदर्भात ठाणेदार पितांबर जाधव यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील आजंती पारधी बेडा व मुकिंदपूर पारधी बेड्यातील महिलांनी दारू विक्रीविरूद्ध एल्गार पुकारला आहे. या समाजातील महिलांनी यासाठी पुढाकार घेतला. बेड्यातील गावठी दारू विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दारूमुळे जीवहानी होण्याची भीती व्यक्त करतानाच त्यांनी यापूर्वी झालेल्या घटनांची जाणीव पोलिसांना करून दिली. प्रत्यक्ष ठाणेदारांची भेट घेऊन त्यांनी बेड्यातील वास्तव मांडले. निवेदन देताना अरुषा पवार, जीवयाला पवार, शानदारी पवार, कश्मीरा पवार, हासपेना पवार आदींची उपस्थिती होती.