गुरुदेव जिनिंगचा परवाना रद्दसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:40 PM2017-12-21T21:40:15+5:302017-12-21T21:40:28+5:30
येथील जय गुरुदेव जिनिंग अॅन्ड प्रेसिंगच्या संचालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. धनादेश वटले जात नाही. त्यामुळे या जिनिंगचा परवाना रद्द करावा, अशी मागणी येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
ऑनलाईन लोकमत
कळंब : येथील जय गुरुदेव जिनिंग अॅन्ड प्रेसिंगच्या संचालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. धनादेश वटले जात नाही. त्यामुळे या जिनिंगचा परवाना रद्द करावा, अशी मागणी येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. तसे निवेदन तहसीलदार रणजित भोसले यांना सादर केले आहे.
या जिनिंगमध्ये कापूस न विकल्यास शेतकऱ्यांना दमदाटी केली जाते, मागील हप्त्यात नरसापूर येथील शेतकरी विशाल अशोक देशमुख यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शेखर थोटे व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा नोंदविला. पणन संचालकांनीे या जिनिंगचा परवाना रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, नगराध्यक्ष दिगांबर मस्के, पणन महामंडळाचे संचालक सुरेश चिंचोळकर, बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप, चंद्रशेखर चांदोरे, खरेदी विक्री संघाचे सभापती बालू पाटील दरणे, प्रा.घनश्याम दरणे, नगरसेवक आशिष धोबे, योगेश धांदे, मधुकर गोहणे, देविदास काळे, मुश्ताक शेख, विजय बुरबुरे, गणेश जुनघरे, शिशिर खंगार, रमेश धोटे, राजेश भोयर, गजानन दरणे, अनिल जाधव आदी उपस्थित होते.