कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:58 PM2018-01-23T23:58:21+5:302018-01-23T23:59:12+5:30
राज्यातील सर्व जिल्ह्याचे रोस्टर पूर्ण करून मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याच्यादृष्टीने कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना येथे दिले. यावेळी माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यातील सर्व जिल्ह्याचे रोस्टर पूर्ण करून मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याच्यादृष्टीने कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना येथे दिले. यावेळी माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते.
बंद झालेल्या शाळा पूर्ववत सुरू कराव्या, ग्रामीण भागातील कोणत्याही शाळा बंद करू नका, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांची पदे विभागीयस्तरावर सरळसेवेने भरण्याच्यादृष्टीने कारवाई करा, २३ आॅक्टोबरच्या शासन निर्णयातील जाचक अटी रद्द करून १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ द्या, पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी द्या आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे.
निवेदन देताना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सिद्धार्थ भवरे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष किरण मानकर, कार्याध्यक्ष राजू सूर्यवंशी, अनिल डोंगरे, डी.जी. पाईकराव, मंदा लभाणे, शीतलकुमार वानखेडे, राजेंद्र वाघमारे, नंदराज गुजर, डॉ. सदांशिव, प्रवीण गोबरे, कृष्णा ढोले, प्रवीण देवतळे, प्रकाश बागडे, हरिश रामटेके, अरुणा बन्सोड, महेंद्र कावळे, घनश्याम पाटील, प्रमोदिनी रामटेके, गिरिधर ढोक, साहेबराव वºहाडे, जे.डी. काळे, ए.एस. मस्के, संजय वाने, गौरव वाकोडे, संजय विनकरे आदींची उपस्थिती होती.