चार ट्रकमधून १०५ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:18 AM2017-10-13T01:18:04+5:302017-10-13T01:18:15+5:30
राष्टÑीय महामार्गावरून होणारी जनावरांची तस्करी पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आली असून चार ट्रकमधून १०५ जनावरांची सुटका करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : राष्टÑीय महामार्गावरून होणारी जनावरांची तस्करी पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आली असून चार ट्रकमधून १०५ जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई राळेगाव तालुक्यातील बोरी-इचोड गावाजवळ गुरुवारी पहाटे करण्यात आली. वडकी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले असून ६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कुंदन विदेशीलाल सहारे, शेख अकील शेक अयुब, प्यारेमोहन अयुब खान पठाण, जितेंद्र राऊत, सलीम अब्दूल कुरेशी, साजिद बेग बदूजमा बेग, साजीद खान हबीब खान, शेख जमीद खान शेख नुदीर खान सर्व रा. नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. नागपूर-हैदराबाद राष्टÑीय महामार्गावरून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती वडकी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोरी येथे वाहनांची तपासणी सुरू केली. रात्री १ वाजताच्या सुमारास जनावरांचे चार ट्रक अडविण्यात आले. त्यात १०५ जनावरे होती. यावेळी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले. सर्वांविरुद्ध प्राणी रक्षण कायदा, प्राण्यांना निदर्यतेने वागणूक प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. चारही ट्रक वडकी ठाण्यात जमा करण्यात आले. ही कारवाई वडकीचे ठाणेदार दीपक पवार, एपीआय दीपक काँक्रेटवार, सूरज चिव्हाणे, रुपेश जाधव, गणेश मेसरे आदींनी केली.