राखीव वनात तस्करांचा धुमाकूळ

By admin | Published: May 30, 2016 12:08 AM2016-05-30T00:08:06+5:302016-05-30T00:08:06+5:30

तालुक्यातील जंगलात दिवसाढवळ्या सागवानासह आडजात वृक्षांची कत्तल होत असून या प्रकाराकडे वन अधिकाऱ्यांची डोळेझाक होत आहे.

Rescue of smugglers in the reserve forest | राखीव वनात तस्करांचा धुमाकूळ

राखीव वनात तस्करांचा धुमाकूळ

Next

दिवसाढवळ्या सागवान कत्तल : पुसद वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
पुसद : तालुक्यातील जंगलात दिवसाढवळ्या सागवानासह आडजात वृक्षांची कत्तल होत असून या प्रकाराकडे वन अधिकाऱ्यांची डोळेझाक होत आहे. परिणामी सागवान तस्करांचे चांगलेच फावत असून शहर व परिसरातील काही आरामिशनवर तस्करीतील सागवानाची खरेदी केली जात असल्याची माहिती आहे. या गोरख धंद्यांत अडकल्याची माहिती वन विभागाला असली तरी कारवाई मात्र केली जात नाही.
पुसद तालुक्यात चारही बाजूला घनदाट जंगल आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात सागवान आणि इतर मौल्यवान वृक्ष आहे. परंतु गत काही दिवसांपासून ही वनसंपदा धोक्यात आली आहे. तालुक्यातील तस्करांसह परप्रांतातील तस्करही थेट जंगलात शिरुन सागवानाची तोड करीत आहे. घनदाट जंगलात दिवसाढवळ्या सागवानाची तोड केली जाते. याला स्थानिकांचे पाठबळ मिळते. तोडलेले सागवान वाहनाद्वारे पद्धतशीरपणे बाहेर आणले जाते. त्याची विल्हेवाट लावण्यात येते. यात मौल्यवान सागवान नष्ट होत आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार माहीत असतो. परंतु आर्थिक हितसंबंधामुळे कारवाई केली जात नाही. काही आरा मिशनवर सागवानाची अवैध कटाई केली जात असल्याची माहिती आहे. आरामशीनची तपासणी केल्यास हा प्रकार उघडकीस येऊ शकतो.
एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा म्हणत आहे. दोन कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन केले जात आहे. त्याच काळात पुसद तालुक्यात बहरलेले जंगल तोडले जात आहे. वृक्षतोड हा अनेकांचा मुख्य व्यवसाय झाला आहे.
काहीही न करता मोठ्या प्रमाणात यात पैसा मिळत असल्याने अनेक जण यात गुंतले आहे. तर काही ठिकाणी मालकी हक्काच्या सागवान तोडीसोबत जंगलातील सागवान तोडून त्यात मिसळले जाते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rescue of smugglers in the reserve forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.