बँकांसमोर शेतकºयांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 10:15 PM2017-08-02T22:15:57+5:302017-08-02T22:16:26+5:30

बँकांनी ऐनवेळी पीक विम्यासाठी आॅफलाईन अर्ज स्वीकारणे बंद केल्याने बुधवारी शेतकºयांनी बँकांसमोर प्रचंड आक्रोश केला.

The resentment of farmers in front of banks | बँकांसमोर शेतकºयांचा आक्रोश

बँकांसमोर शेतकºयांचा आक्रोश

Next
ठळक मुद्देपीक विमा : सकाळचा आदेश सायंकाळी फिरविला, अधिकाºयांना धारेवर धरले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बँकांनी ऐनवेळी पीक विम्यासाठी आॅफलाईन अर्ज स्वीकारणे बंद केल्याने बुधवारी शेतकºयांनी बँकांसमोर प्रचंड आक्रोश केला. त्यांचा संताप अनावर होऊन त्यांनी बँक अधिकाºयांना धारेवर धरले.
पीक विम्याची मुदत ३१ जुलैला संपली. अनेक शेतकºयांना विविध आडचणी आणि आॅनलाईन प्रक्रियेमुळे विमा काढून पीक संरक्षित करणे कठीण झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधून विमा हप्ता भरण्यासाठी मुदत वाढवून मागितली. त्यानुसार मंगळवारी १ आॅगस्टला वाढीव मुदतीचा आदेश राज्य शासनाचे अवर सचिव श.बा. पावसकर यांनी काढला. त्यात ५ आॅगस्टपर्यंत विमा स्वीकारला जाईल, तसेच बँकांमध्ये अर्ज भरण्यास मुभा देण्यात आली होती. यामुळे मंगळवारी बँकांमध्ये शेतकºयांची गर्दी उसळली.
राज्य शासनाच्या या आदेशाने शेतकºयांना थोडा दिलासा मिळाला. मात्र शासनाने मंगळवारीच उशिरा हा आदेश फिरवून विम्याची मुदत ४ आॅगस्टपर्यंत केली. त्यात आॅनलाईन अर्जाची सक्ती केली. बिगर कर्जदार शेतकºयांचे अर्ज बँकांनी स्विकारूच, नये अशा सूचनाही दिल्या. हा आदेश बुधवारी दुपारी बँकांमध्ये धडकताच बँकांनी आपल्या शाखांना आॅफलाईन अर्ज स्विकारू नये, असे आदेश दिले. यामुळे बँकेसमोर रांगेत उभे असलेले शेतकरी प्रचंड संतापले. त्यांनी व्यवस्थापकांना धारेवर धरले. अखेर बँकांनी जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन मागविले आहे. अद्याप या प्रश्नावर तोडगा निघाला नाही.

वंचित शेतकºयांसाठी उरले दोनच दिवस
जिल्ह्यात ३३ हजार कर्जदार आणि ४१ हजार बिगर कर्जदार शेतकºयांनी पिकांचा विमा उतरविला आहे. एकूण ७४ हजार शेतकºयांनी विमा उतरवून आपले पीक संरक्षित केले. उर्वरित शेतकºयांना येत्या ४ आॅगस्टपर्यंत म्हणजे केवळ दोनच दिवस विमा काढता येणार आहे.

ऐनवेळच्या सुधारित आदेशाने गोंधळ उडाला. आदेश धडकताच बँकांनी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया थांबविली. मात्र तत्पूर्वी स्विकारलेले अर्ज विमा कंपनीने स्विकारावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
- अरविंद देशपांडे
सीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ

Web Title: The resentment of farmers in front of banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.