आरक्षण, आमचा घटनादत्त अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 10:46 PM2017-12-06T22:46:12+5:302017-12-06T22:47:54+5:30
आरक्षण ही काही भीक नाही, तो आमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनादत्त अधिकार आहे. तो आम्ही घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : आरक्षण ही काही भीक नाही, तो आमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनादत्त अधिकार आहे. तो आम्ही घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ओबीसींची संख्या ५२ टक्केच्यावर असूनही आरक्षण २७ टक्के आहे, हे सांगून ओबीसींनाच अटी व शर्ती का, विद्यार्थ्यांना अर्धी शिष्यवृत्ती का, त्याने सरकारी नोकरी करायचीच नाही काय, ओबीसी-कुणबी, शेतकºयांचा मुलगा शिकेल कसा, अशा विविध प्रश्नांची उकल व्याख्याते प्रवीण देशमुख यांनी केले.
येथील आझाद मेदानात आयोजित स्मृती पर्वात मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आरक्षणाची गरज का?’ या विषयावर त्यांनी विचार मांडले.
प्रवीण देशमुख म्हणाले, ओबीसी कुणबी हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असायचा. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांची पार वाट लावली आहे, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. विदर्भात विशेषत: यवतमाळात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहेत. तो कधी कर्जबाजारीपणा, नापिकी, विषबाधा, शेतमालाला मिळणारा अल्प दर इत्यादी कारणांमुळे दररोज मरतो आहे. तरीदेखील कुणीच त्याच्या पाठिशी उभे राहायला तयार नाही. शेतकºयाला एकाकी पाडले जात आहे. शेती व्यवसायात त्यांचे जीवन सुरक्षित नाही याची जाणीव शेतकºयाला आता होऊ लागली आहे. म्हणूनच माँ जिजाऊ व शिवबांचा अनुयायी आता आपले हक्क व अधिकाराची लढाई लढायला तयार झाला आहे, असे ते म्हणाले. मंडल आयोग, ओबीसी जनगणना, पदोन्नतीतील आरक्षण, ओबीसीचे क्रिमिलीअर, फोफावणारा मनुवाद, अदृश अणीबाणी आदी विषयांचा परामर्श त्यांनी घेतला.
यावेळी अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले होते. प्रारंभी प्राजक्ता मुनेश्वर, सरिता देशमुख, यश चव्हाण, मोहित गोळे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, पप्पू पाटील भोयर, डॉ. छाया महाले, वैशाली सवाई, उषा दिवटे, विजय खडसे, अरुण राऊत, प्रदीप वादाफळे, जिनेंद्र ब्राह्मणकर, योगेश धानोरकर, नंदू बुटे, विशाल चुटे, प्रवीण भोयर, योगिराज अरसोड, रमेश होनाडे, महेंद्र वेळूकार, पीयूष चव्हाण, कल्पना कोरडे, सतीश डोळे, प्रा.डॉ. अशोक राणा आदी मंचावर उपस्थित होते. स्मृती पर्वाचे समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, कवडु नगराळे, सुनीता काळे, माया गोरे, प्रा. सविता हजारे, लक्ष्मीकांत लोळगे, आनंद गायकवाड, सुनील वासनिक, संजय बोरकर आदींची उपस्थिती होती.