आरक्षण बचाव संषर्घ समितीचे धरणे

By admin | Published: July 26, 2016 12:06 AM2016-07-26T00:06:43+5:302016-07-26T00:06:43+5:30

वैद्यकीय अधिष्ठातांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे देण्यात आले.

Reservations for the Reservation Rescue Committee | आरक्षण बचाव संषर्घ समितीचे धरणे

आरक्षण बचाव संषर्घ समितीचे धरणे

Next

यवतमाळ : वैद्यकीय अधिष्ठातांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे देण्यात आले. 
वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी.एस.येलके यांना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांनी अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली. यानंतर झालेल्या प्राध्यापकांच्या बैठकीतही शिवीगाळ करण्यात आली. यामुळे अधिष्ठातांवर अ‍ॅट्रोसिटी कायद्याच्या कलम ३, १, १० खाली गुन्हे नोंदविण्यात यावे यासोबतच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गुन्हे नोंदविण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
या धरणे आंदोलनात डॉ. बी.एस.येलके, बाळकृष्ण गेडाम, नामदेव मडावी, दिलीप मडावी, प्रफुल्ल आडे, प्रल्हाद सिडाम, किशोर सलामे, विजय गेडाम, किसन किनाके, राजू कुडमेथे, शंकर कोटनाके, बाबाराव मडावी, किशोर उईके, रवी कंगाले, दिनेश चिंडाले उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

Web Title: Reservations for the Reservation Rescue Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.