नगरपरिषद शिक्षकांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:12 PM2018-09-15T22:12:42+5:302018-09-15T22:13:34+5:30

नगरपरिषदेअंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. त्याअनुषंगाने नगरविकास मंत्रालयात शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात शालेय शिक्षण विभाग व नगरविकास विभागातील अधिकारी तसेच विदर्भ नगरपरिषद शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली.

 Resolve the problem of Municipal Council teachers | नगरपरिषद शिक्षकांच्या समस्या सोडवा

नगरपरिषद शिक्षकांच्या समस्या सोडवा

Next
ठळक मुद्देरणजीत पाटील यांचे आदेश : विदर्भ शिक्षक संघ पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : नगरपरिषदेअंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. त्याअनुषंगाने नगरविकास मंत्रालयात शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात शालेय शिक्षण विभाग व नगरविकास विभागातील अधिकारी तसेच विदर्भ नगरपरिषद शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यात विविध समस्या सोडविण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री ना.रणजित पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे पालिकेअंतर्गत कार्यरत शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
नगर परिषदेद्वारा संचालित 'क' वर्ग नगरपरिषदेप्रमाणे 'अ' व 'ब' दर्जाच्या नगरपालिकेतील शिक्षकांच्या वेतानाला १०० टक्के अनुदान देण्यात यावे, यासाठी नगरविकास मंत्रालयातर्फे प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाप्रमाणे रजा प्रवास सवलत देण्याविषयी कार्यवाही करावी, १५ टक्के नक्षलभत्ता सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावा, यासह विविध समस्या सोडविण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी शिक्षण विभागाचे अव्वर सचिव रासकर, पाटील यांचे स्वीय सचिव श्यामकांत मस्के, यवतमाळचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ उपस्थित होते. विदर्भ न.प.शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी गजानन कासावार, कैलास पराते, वसंत गोरे, राजेंद्र कटकमवार, सीताराम राठोड, राजेंद्र मेनकुदळे, अनिकेत निंबाळकर, खेमराज तिघरे, शैलेश अवस्थी, मिलिंद गंगशेट्टीवार उपस्थित होते.

Web Title:  Resolve the problem of Municipal Council teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक