साडेतीन हजार शेतकऱ्यांची रिसोर्स बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:00:24+5:30
यवतमाळ जिल्ह्यासाठी खताचे अतिरिक्त दोन रॅक पॉर्इंटसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याला मंजुरी मिळाली आहे. युरिया व इतर कुठलेही खत शेतकऱ्यांना कमी पडणार नाही. जिल्ह्यात ९९५ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण उद्दिष्टाच्या ४४ टक्के वाटप झाले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे ७०८ कोटी येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात नावीण्यपूर्ण प्रयोग करतात. अशा शेतकऱ्यांची यादीच तयार केली असून साडेतीन हजार शेतकरी रिसोर्स बँक म्हणून काम करणार आहे. ते इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतील. कृषी यंत्रणेने रबी व उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावे व पीक पद्धतीतही बदल घडवावा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले.
यवतमाळ जिल्ह्यासाठी खताचे अतिरिक्त दोन रॅक पॉर्इंटसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याला मंजुरी मिळाली आहे. युरिया व इतर कुठलेही खत शेतकऱ्यांना कमी पडणार नाही. जिल्ह्यात ९९५ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण उद्दिष्टाच्या ४४ टक्के वाटप झाले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे ७०८ कोटी येणार आहे. त्यासाठी ९८ हजार ४६२ शेतकºयांना पुन्हा कर्ज मिळणार आहे. पीक कर्जाला उशिर झाला. परंतु नियोजन केले जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत तीन लाख ३० हजार शेतकरी पात्र आहे. त्यापैकी दोन लाख ६३ हजार शेतकऱ्यांना हप्ता मिळाला आहे. पीक विम्याच्या मुद्यावर संजय राठोड यांनी सूचना केल्या होत्या. त्याबाबतही केंद्र सरकारच्या नव्या निर्देशानुसार पीक विमा तीन वर्षांसाठी व ऐच्छिक राहणार आहे. जिल्ह्यात ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. बांधावर खते व बियाणे हा उपक्रम यशस्वी झाला. बियाण्याबाबत तीन हजार ९९६ तक्रारी आल्या आहे. यासंदर्भाने गुन्हा नोंदविणे, परवाना रद्द करणे, अशी कारवाई सुरू असल्याचे ना.भुसे यांनी सांगितले. बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, सभापती श्रीधर मोहोड, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.