जलदगतीने न्यायदानाची जबाबदारी वकील मंडळींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 09:54 PM2019-02-25T21:54:00+5:302019-02-25T21:54:12+5:30
ज्याप्रमाणे न्यायदान करण्याची जबाबदारी न्यायालयावर असते. त्याचप्रमाणे न्यायदान हे कायद्याप्रमाणे आणि जलदगतीने अशिलांना मिळाले पाहिजे, याची जबाबदारी वकील मित्रांवर आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल्हा न्यायिक पालक न्यायमूर्ती ए.एस.चांदुरकर यांनी कले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : ज्याप्रमाणे न्यायदान करण्याची जबाबदारी न्यायालयावर असते. त्याचप्रमाणे न्यायदान हे कायद्याप्रमाणे आणि जलदगतीने अशिलांना मिळाले पाहिजे, याची जबाबदारी वकील मित्रांवर आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल्हा न्यायिक पालक न्यायमूर्ती ए.एस.चांदुरकर यांनी कले.
येथील नवीन न्यायालयाच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर.पेठकर होते. मंचावर अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एस.के.तिखिले, वकील संघाचे अध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते. पांढरकवडा वकील संघाला खूप मोठा जूना वारसा आहे. १०० वर्षे लवकरच या वकील संघाला होणार आहे. नवीन इमारतीत एका छताखाली विविध न्यायालये उपलब्ध राहणार आहे. अशिलांना आपल्या वकीलांना भेटण्यासाठी व तारखेवर हजर राहण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत न्यायमूर्ती चांदुरकर यांनी व्यक्त केले. तसेच २२ कोटींच्या होणाऱ्या नवीन दोन मजली न्यायालयात दोन अतिरीक्त जिल्हा न्यायालयासह एकुण आठ न्यायालये राहणार असल्याचे सत्र न्यायाधीश पेठकर यांनी सांगितले. प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले. यावेळी वकील मंडळी व न्यायाधिश मोठ्या संख्येने उपस्थित होते.