पोलीस पाटलांचे निलंबन मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 10:00 PM2017-11-07T22:00:01+5:302017-11-07T22:00:15+5:30

फवारणीतील मृत्यू प्रकरणात तीन तालुक्यांतील पोलीस पाटील निलंबित करण्यात आले. प्रशासनाची ही कारवाई चुकीची असून निलंबन मागे घ्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनने केली आहे.

Retract the suspension of Police Patrols | पोलीस पाटलांचे निलंबन मागे घ्या

पोलीस पाटलांचे निलंबन मागे घ्या

Next
ठळक मुद्देसंघटना आक्रमक : जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : फवारणीतील मृत्यू प्रकरणात तीन तालुक्यांतील पोलीस पाटील निलंबित करण्यात आले. प्रशासनाची ही कारवाई चुकीची असून निलंबन मागे घ्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनने केली आहे. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
कळंब, मारेगाव आणि पांढरकवडा तालुक्यातील पोलीस पाटलांना निलंबित करण्यात आले. तर काहींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दवाखान्यात दाखल रूग्णांना आपण कशामुळे आजारी पडलो, हेच समजत नव्हते. सर्वसामान्य रूग्णांप्रमाणे ते दवाखान्यात भरती झाले. पोस्टमार्टम रिपोर्ट मिळालेल्या गावामध्ये पोलीस पाटलांनी पोलीसांना कळवले. काही पोलीस पाटलांनी तत्काळ फोनवर माहिती दिली. कळंब तालुक्यातील पिंपळगाव होरे येथील पोलीस पाटील पिसे यांनी ठाणेदारांना लेखी माहिती दिली. यानंतरही त्यांचे निलंबन झाले. हा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप पोलीस पाटील संघटनेने केला आहे. सर्वच पोलीस पाटलांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे, उपाध्यक्ष लोकचंद राठोड, निरंजन गायकवाड, नारायण बेंडे, रूपेश सावरकर, ललिता पवार, संगीता आदेवार, श्याम गावंडे, विजय वानखडे, दीपक तट्टे, विलास देसकरी, निखिल बोरखडे उपस्थित होते.

Web Title: Retract the suspension of Police Patrols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.