पुसद, महागावमध्ये महसूलचे कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:00 AM2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:09+5:30
महागाव येथे तिवारी यांचा निषेध करून महसूल कर्मचाºयांनी लेखणीबंद आंदोलन केले. तिवारी यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली. सर्व कर्मचाºयांनी शुक्रवारी एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन पुकारून तिवारी यांच्यावर कारवाई न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद/महागाव : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घाटंजी येथील महिला तहसीलदार व दोन महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शब्दात बोलून त्यांचा अपमान केला. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी पुसद व महागाव तालुक्यातील महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.
पुसद येथे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अवल कारकून, तलाठी, लिपिक, वाहन चालक, शिपाई, कोतवाल आदींनी आंदोलन केले. येथील तहसील कर्मचाºयांनी शुक्रवारी कामबंद आंदोलनात सहभागी होऊन आपल्या महिला भगिनींना पाठिंबा दर्शविला. कर्मचाºयांनी कार्यालयात स्वाक्षरी करून कार्यालयासमोर आंदोलन करून तिवारी यांचा निषेध केला.
महागावात लेखणीबंद
महागाव येथे तिवारी यांचा निषेध करून महसूल कर्मचाºयांनी लेखणीबंद आंदोलन केले. तिवारी यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली. सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन पुकारून तिवारी यांच्यावर कारवाई न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला.
आंदोलनात नायब तहसीलदार नामदेव इसाळकर, एस.एस. आदमुलवाड, एम.एन. पेंदोरकर, मंडळ अधिकारी ए. यू.ढबाले, एस.एन.भोयर, तलाठी संघटनेचे जी.एच. कवाने, पी.एम. लव्हाळे, ए.एच.मनवर, ए. यू. बोंबले, दीपक दिवेकर, महसूल कर्मचारी संघटनेचे बाळासाहेब खैरे, एम.जी. पाईकराव, डी.एच. हातमोडे, यू.बी.पांडे, ए.आर. अरसुळे, डी.डी.आडे, आर. व्ही.वैद्य, आर.आर. घोरमाडे, के.के. गॅरल, टी.यू. भडंगे, जी.बी. गोरे, बी.डी. देशमुख, ए.जी. फाटे, व्ही.एस. हुपाडे, व्ही.एस. पानपट्टे, जी.एन. तगडपल्लेवार, डी.एन. बनसोड, वाहन चालक संघटनेचे एम.एच.आडे, शंकर चव्हाण, बी.के.गरडे, प्रवीण वाहुळे आदी सहभागी झाले होते.