कापूस व सोयाबीन केंद्राचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:03 PM2017-10-23T22:03:28+5:302017-10-23T22:03:42+5:30
कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्रासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्रासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक सी.पी. गोस्वामी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन. मगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करा. कोणताही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहता कामा नये. तातडीने सर्वांनी नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. याबाबत शेतकºयांना विविध माध्यमातून जनजागृतीद्वारे माहिती द्या, शासनाच्या मागदर्शक सूचनांचे पालन करून नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकाºयांनी सीसीआय आणि कॉटन फेडरेशनचे किती खरेदी केंद्र आहेत, तसेच सोयाबीनचे खरेदी किती केंद्रावर केली जाते, आतापर्यंत जिल्ह्यात किती शेतकºयांची नोंदणी झाली आदी बाबींची माहिती संबंधितांकडून घेतली.
जिल्ह्यात सीसीआयचे राळेगाव, खैरी, मारेगाव, मुकुटबन, पांढरकवडा, शिंदोला, वाढोणाबाजार, वणी आदी ठिकाणी खरेदी केंद्र आहेत. तसेच मूग, उडीद आणि सोयाबीन मिळून आतापर्यंत दोन हजार ४७३ शेतकºयांची नोंदणी झाल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उपस्थित होते. खरेदी केंद्रामध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी सूचना या बैठकीत संबंधितांना करण्यात आल्या.