गृहराज्यमंत्र्यांकडून समस्यांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:05 PM2017-09-22T23:05:54+5:302017-09-22T23:05:57+5:30
राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी मुख्याध्यापक शिक्षकांची सभा घेऊन शिक्षण क्षेत्रातील समस्येचा आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी मुख्याध्यापक शिक्षकांची सभा घेऊन शिक्षण क्षेत्रातील समस्येचा आढावा घेतला. शासनस्तरावरील समस्या शासन दरबारी पाठपुरावा करून मार्गी लागेल व प्रशासनस्तरावरील समस्यांचा ुुअधिकाºयांना जाब विचारून तत्काळ निपटारा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
येथील प्रा. महादेव खाडे यांच्या निवासस्थानी शिक्षकांच्या कोअर कमिटीची सभा घेण्यात आली. यावेळी गजानन कासावार व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वि.ना.ताजने यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा पाढा वाचला. तसेच शिक्षकांकडून आलेल्या निवेदनावर चर्चा करण्यात आली. संचालन संजय देवाळकर यांनी केले. त्यानंतर वसंत जिनिंग फॅक्टरीच्या सभागृहात संवाद सभा घेण्यात आली. आ.संजीवरेड्डी बोदकुरवार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शहराध्यक्ष रवी बेलुरकर, तालुकाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, विजय चोरडीया, डॉ.महेंद्र लोढा, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भुमकाळे, शिक्षक परिषदेचे राजेश मदने यांची मंचावर उपस्थिती होती. संचालन प्रा.महादेव खाडे यांनी केले. समस्यांचा निपटारा करण्याचे आश्वासन डॉ.रणजित पाटील यांनी यावेळी दिले. त्यानंतर ना.पाटील यांनी नगरपरिषदेला भेट दिली. शहराच्या विकासासाठी विविध योजना मंजुर करून देण्याची हमी त्यांनी दिली.