पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:19 AM2017-07-18T01:19:40+5:302017-07-18T01:19:40+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी विविध विभागांचा आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन ना. येरावार यांनी केले.
यावेळी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीष सरोदे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील एकूण पेरणीबाबत आढावा खत, बियाणे आदींची परिस्थिती तसेच आरोग्य विभाग, शासकीय आश्रमशाळा, विविध विभागातील रिक्त पदे, अन्न सुरक्षा योजना, आरोग्य सुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, आदिवासी प्रकल्पाबाबत माहिती, रुग्णालयांचा आढावा, अंत्योदय, बीपीएल, एपीएल आदींबाबत माहिती घेतली. या बैठकीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.