महावितरण आणणार सुधारित बिलिंग प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:19 PM2019-04-16T22:19:54+5:302019-04-16T22:20:23+5:30

ग्राहकांना योग्य गुणवत्तेची वीज मिळावी याकरिता महावितरण सुधारित बिलिंग प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी महावितरणतर्फे ग्राहक जनजागृती शिबिर घेण्यात आले.

Revised billing system to bring MSEDCL | महावितरण आणणार सुधारित बिलिंग प्रणाली

महावितरण आणणार सुधारित बिलिंग प्रणाली

Next
ठळक मुद्देजनजागृती शिबिर : उच्चदाब ग्राहकांसाठी ‘केव्हीएएच’ प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ग्राहकांना योग्य गुणवत्तेची वीज मिळावी याकरिता महावितरण सुधारित बिलिंग प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी महावितरणतर्फे ग्राहक जनजागृती शिबिर घेण्यात आले.
अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडले. अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे, योगेश वारके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय श्रृंगारे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष नंदू सुराणा, सचिव आनंद भुसारी यावेळी उपस्थित होते.
उच्चदाब व २० किलो वॅटवरील ग्राहकांसाठी पुढील काळात किलो व्होल्ट अ‍ॅम्पियर अवर (केव्हीएएच) बिलिंग प्रणाली महावितरणने प्रस्तावित केली आहे. ग्राहकांसाठी सोईच्या असलेल्या या प्रणालीबाबत शिबिरात ग्राहकांना माहिती देण्यात आली. या बिलिंग प्रणालीचा मुख्य उद्देश हा ग्राहकाने पॉवर फॅक्टर एक ठेवावा, जेणेकरून वितरण हानी कमी होईल व विजेचा दर्जा वाढून ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेची वीज मिळावी हा आहे. या प्रणालीत जास्त रिअ‍ॅक्टीव्ह पॉवर वापरणाऱ्या ग्राहकांना जास्त बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कमीत कमी रिअ‍ॅक्टीव्ह पॉवर वापरण्यासाठी ही प्रणाली प्रोत्साहीत करणार आहे. याशिवाय इन्सेन्टीव्ह व पेनॉल्टी वेगळी लावण्याची या प्रणालीत गरज नाही.
ग्राहकांच्या शंकांचे केले समाधान
महावितरणने आपल्या व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये बदलत्या गरजानुसार गेल्या तीन वर्षात अनेक ग्राहकाभिमुख बदल केले आहे. त्याचेच पुढील पाऊल म्हणून केव्हीएएच बिलिंग प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. ग्राहकांसाठी संपूर्णपणे नवीन असलेल्या या प्रणालीबाबत उपकार्यकारी अभियंता संगीता चव्हाण यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशनद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच ग्राहकांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले.

Web Title: Revised billing system to bring MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.