जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सूत्रधारांच्या मुसक्या आवळा

By admin | Published: September 22, 2016 01:50 AM2016-09-22T01:50:14+5:302016-09-22T01:50:14+5:30

शहरात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सातत्याने समाजकंटकांकडून विविध घटना घडवून आणल्या जातात.

The riders of the community are making fun of him | जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सूत्रधारांच्या मुसक्या आवळा

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सूत्रधारांच्या मुसक्या आवळा

Next

जमाते इस्लामी हिंद : जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटले शिष्टमंडळ
उमरखेड : शहरात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सातत्याने समाजकंटकांकडून विविध घटना घडवून आणल्या जातात. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने जातीय तेढ निर्माण करू पाहणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी जमाते इस्लामी हिंदच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे बुधवारी केली.
उमरखेड शहरात १५ सप्टेंबर रोजी उसळलेल्या दंगलीत शहरातील काही दुकानांना आगी लावून सामान्य व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान करण्यात आले. ही बाब अतिशय निंदनीय आहे. काही समाजकंटकांमुळे संपूर्ण सभ्य समाजाला त्रास सहन करावा लागतो. अशा लोकांना वेळीच जेरबंद करण्याची गरज आहे. शहरातील नृसिंह आॅटोमोबाईल्स, ममता जनरल स्टोअर्स, खजाना साडी सेंटर, कय्यूम किराणा, निसार किराणा, कुरेशी कॉम्प्युटर या दुकानांची तोडफोड झाली. यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले. पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना अटक केल्यास शहरात अशा घटना वारंवार घडणार नाही, असेही जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच नुकसानग्रस्त गोरगरीब दुकानदारांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी जमाते इस्लामी हिंद संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ.हकीम शेख, मुव्हमेंट फॉर पीस अ‍ॅन्ड जस्टीसचे राज्य सचिव मो.अलताफ हुसेन, नांदेड शहराध्यक्ष मोईर्जूरहमान, असोसिएशन फॉर प्रोटेक्ट सिव्हिल राईटचे जिल्हाध्यक्ष इम्तेयाज खान, एमपीजेचे जिल्हाध्यक्ष इब्राहीम खान मजीद खान, अ‍ॅड.नसरूल्लाह खान, रऊफ नहवी, फिरोज अन्सारी, महेमूद जनाब, राहत अन्सारी, साकीब एकबाल, खलिद शेख आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The riders of the community are making fun of him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.