घाटातील दरड कोसळू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:52 PM2018-07-19T23:52:26+5:302018-07-19T23:53:22+5:30
शिबला ते झरी या मार्गावरील घाटातील दरड कोसळू लागल्याने या मार्गावरून चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शिबला ते झरी हा मार्ग जंगलातील दरड फोडून तयार करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
माथार्जुन (झरी ) : शिबला ते झरी या मार्गावरील घाटातील दरड कोसळू लागल्याने या मार्गावरून चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
शिबला ते झरी हा मार्ग जंगलातील दरड फोडून तयार करण्यात आला आहे. मात्र आता या मार्गाच्या दुतर्फा असलेली दरड कोसळत असून रस्त्याच्या कडेला माती व मुरूम येऊन पडत आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघातसुद्धा घडत आहेत. त्याचबरोबर अनेक वृक्षांची मुळेसुद्धा दिसू लागली असून ही झाडेही आता कोसळण्याच्या वाटेवर आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बांधकाम विभागातर्फे अशी धोकादायक झाडे तोडण्यातच आली नाही. हा मार्ग वर्दळीचा असल्यामुळे पांढरकवडावरून नागरिकांना याचमार्गे झरीला जावे लागते. त्यामुळे बांधकाम विभागाने धोकादायक झाडून मार्ग सुव्यवस्थित करावा, अशी मागणी आहे.