दिल्लीतील दंगलीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील शाहीनबाग आंदोलन समितीच्या महिलांनी महात्मा फुले चौकात धरणे देत दिल्लीतील दंगलीचा निषेध नोंदविला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील शाहीनबाग आंदोलन समितीच्या महिलांनी महात्मा फुले चौकात धरणे देत दिल्लीतील दंगलीचा निषेध नोंदविला. या दंगलीसाठी चिथावणी देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी महिलांनी केली. शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे निवेदन पाठविण्यात आले.
केंद्र सरकारने घटनाबाह्यरित्या नागरिकत्व संशोधन कायदा आणला आहे. या कायद्याविरोधात संपूर्ण देशात आंदोलन सुरू आहे. दिल्ली येथील शाहीनबाग आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहे. यवतमाळातही शाहीनबाग आंदोलन समिती सक्रीय आहे. समितीचे अन्यायाविरोधात आंदोलन सुरू आहे. यातच दिल्लीत दंगलीची घटना झाली. संरक्षण करणारे पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे. दिल्लीत दंगल घडविणाºयांच्या विरोधात कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. या सांप्रदायिक दंगलीमध्ये आतापर्यंत ३८ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. या गंभीर घटनेची पोलीस चौकशी करण्याची तसदी भाजप सरकारने घेतली नाही.
दिल्ली दंगल भडकविण्यासाठी भाजपचे अभय वर्मा, मंत्री अनुराग ठाकूर, परवेश वर्मा यांनी स्फोटक विधाने केली. त्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम, हिंदू, पोलीस कर्मचारी यांची जीवितहानी झाली. कोट्यवधीच्या संपत्तीचे नुकसान झाले. या घटनेचा निषेध यवतमाळ शाहीन बाग आंदोलन समितीच्या महिलांनी केला. समितीच्या सादीया सय्यद, सलमा शाहीन, हुमारिया आयेशा, सदिया खान, माहेविश राणा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. तत्पूर्वी महात्मा फुले चौकात निदर्शने करून तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. संपूर्ण मार्गच बंद केला होता.