रिपरिप पावसाने धरणात इंचभरही वाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 09:58 PM2019-07-28T21:58:48+5:302019-07-28T21:59:28+5:30

हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात पाऊस रिमझिमच बरसत आहे. यामुळे गत दोन दिवसात जिल्ह्यात केवळ २० मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे धरणात इंचभरही वाढ झाली नाही. भूजल पातळी सरासरीच्या दीड मिटर खालीच आहे.

Riparp rains do not increase the dam by an inch | रिपरिप पावसाने धरणात इंचभरही वाढ नाही

रिपरिप पावसाने धरणात इंचभरही वाढ नाही

Next
ठळक मुद्देपातळी सव्वा मीटरने खालीच : शनिवारी, रविवारी केवळ २० मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात पाऊस रिमझिमच बरसत आहे. यामुळे गत दोन दिवसात जिल्ह्यात केवळ २० मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे धरणात इंचभरही वाढ झाली नाही. भूजल पातळी सरासरीच्या दीड मिटर खालीच आहे.
जिल्ह्यात पावसाने २५ दिवसांचा खंड दिल्यानंतर आता हजेरी लावली आहे. गेल्या दोन महिन्यात जोरदार पाऊस बरसला नाही. यामुळे नदी-नाले कोरडे आहेत. याच कारणाने धरणातील जलसाठ्यातही वाढ झाली नाही. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार ही भूजलपातळी सध्या १.२४ मिटरने खाली आहे. यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढली नाही. पेयजलाची स्थिती अजूनही सुधारली नाही. यामुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या कायम आहे.

Web Title: Riparp rains do not increase the dam by an inch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.