पावसाविना सहा लाख हेक्टर पिकाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 09:43 PM2019-07-14T21:43:55+5:302019-07-14T21:45:21+5:30

निसर्गाच्या लहरीपणाने पावसात खंड पडण्याचे प्रमाण दवर्षीच वाढत आहे. आता तर चक्क जुलैत पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील सहा लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. तर प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये केवळ १९.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Risk of six lakh hectares without rains | पावसाविना सहा लाख हेक्टर पिकाला धोका

पावसाविना सहा लाख हेक्टर पिकाला धोका

googlenewsNext
ठळक मुद्देधरणांमध्ये केवळ १९.२४ टक्के पाणी शिल्लक : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३ टक्केच पाऊस

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने पावसात खंड पडण्याचे प्रमाण दवर्षीच वाढत आहे. आता तर चक्क जुलैत पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील सहा लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. तर प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये केवळ १९.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४०२ गावांमध्ये अजूनही पाणीटंचाई कायम आहे. या गावांतील एक लाख नागरिकांपुढे भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
मान्सून सक्रीय नसून बंगालच्या खाडीतून येणाऱ्या मोसमी वाºयाचा पाऊस जिल्ह्यात आला आहे. काही भागात हा पाऊस बरसला तर काही भागात अपुरा बरसला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १३.९३ टक्के आहे. अपुºया पावसाने प्रकल्पही भरले नाही. जिल्ह्यातील २५० पाझर तलाव आणि लघुप्रकल्प कोरडे आहेत. इतर प्रकल्पांमध्येही अपुरा जलसाठा आहे.
साधारणत: जुलैत सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र यंदा अर्धा जुलै संपूनही पाऊस १२ दिवसांपासून गायब आहे. यामुळे प्रकल्पातील साठ्यात कुठलीही वाढ झाली नाही. मोठ्या पूस प्रकल्पात सर्वाधिक २१.५८ टक्के पाणी आहे. अरुणावतीमध्ये ९.६४ टक्के जलसाठा आहे. बेंबळा प्रकल्प २८ टक्के भरलेला आहे. इसापूर धरणात अत्यल्प पाणी आहे. चार मोठ्या प्रकल्पात सरारी २०.३७ टक्के पाणी आहे. मध्यम ९ प्रकल्पात १६.८९ टक्के तर ९४ लघु प्रकल्पात १९.४९ टक्के पाणी शिल्लक आहे. ४०२ विहिरी अधिग्रहित करूनही एक लाख पाच हजार नागरिकांची तहान टँकरवरच अवलंबून आहे.

खरीपातील अडचणी वाढल्या
जिल्ह्यात केवळ १२६ मिमी पाऊस बरसला. आता खरिपाचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड सुरू केली आहे. विहिरींची पातळीही वाढली नाही. यामुळे ओलिताच्या शेतीचीही अवस्था कोरडवाहूसारखी झाली आहे. सहा लाख २२ हजार हेक्टरवरील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाऊस न आल्यास हे पीक कोमेजणार आहे.

उमरखेड, दिग्रस, पुसदला फटका
जिल्ह्यातील ४०२ गावामध्ये अजूनही पाणीटंचाई आहे. यात वणी तालुक्यातील १२ गावे, दारव्हा ४२, पुसद ४३, नेर २५, यवतमाळ २७, बाभूळगाव ९, आर्णी ४५, दिग्रस ५४, महागाव १५, केळापूर ३, झरी ४, घाटंजी ४१, राळेगाव ३, कळंब १६, उमरखेड तालुक्यातील ६३ गावांचा समावेश आहे.

Web Title: Risk of six lakh hectares without rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.