झरी तालुक्याला जोडणारा मार्गच दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 09:53 PM2017-11-04T21:53:18+5:302017-11-04T21:53:29+5:30
तालुक्याला जोडणाºया घोन्सा ते झरी याय मुख्य मार्गावर जिवघेणे खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्तीच करण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
झरी : तालुक्याला जोडणाºया घोन्सा ते झरी याय मुख्य मार्गावर जिवघेणे खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्तीच करण्यात आली नाही. घोन्सापासून झरीचे अंतर १५ किलोमीटर असून त्यासाठी तब्बल पाऊण तासाचा कालावधी लागतो.
सालेभट्टी ते जुनोनीपर्यंतचा रस्ता अतिशय दयनीय असून जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे चुकविताना वाहन रस्त्याच्या खाली उतरण्याची दाट शक्यता असते. गेल्या वर्षी या रस्त्याची काम करण्यात आले होते. मात्र तेही अर्धवटच ठेवले. तसेच कामानंतर लगेच एका महिन्यात या रस्त्याची पुन्हा वाट लागली असून रस्ता ‘जैसे थे’ अवस्थेत आला आहे. या मार्गामुळे चारचाकी वाहनांमध्ये बिघाड होत आहे.हा रस्ता घोन्सामार्गे थेट वणीला जोडण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज वर्दळ सुरू असते.