मारेगावात अतिक्रमण काढून रस्ते, नाली, बाजार ओटे होण्याची अपेक्षा, आठवडी बाजार उपेक्षितच : बराच निधी मिळाल्याने अनेक कामे मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:50 AM2021-09-08T04:50:33+5:302021-09-08T04:50:33+5:30
शहरात २०१५ मध्ये नगरपंचायत स्थापन झाल्यावर अपेक्षप्रमाणे निधीही प्राप्त झाला आणि शहरातील वाॅर्डांत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते, नाली, ...
शहरात २०१५ मध्ये नगरपंचायत स्थापन झाल्यावर अपेक्षप्रमाणे निधीही प्राप्त झाला आणि शहरातील वाॅर्डांत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते, नाली, नवरगाव धरणावरील बंद नळ योजना कार्यान्वित केली. शहरातील २५९ नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला. प्रशासकीय कामासाठी नगरपंचायतीची भव्य इमारत बनली. शहरातील वाॅर्ड क्रमांक सहामध्ये बगिचाचे सौंदर्यीकरण झाले. बसस्थानकावर सार्वजनिक शौचालय बांधले गेले, शहरातील ५०० लोकांना शौचालय बांधून दिले, आठवडी बाजारासाठी ओटे बांधले, दररोज शहराची सफाई केली जात आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात काही प्रमाणात भर पडली असे म्हणावे लागेल. याचाच परिणाम नगरपंचायतला राज्य शासनाचे ओडीफ नामांकन प्राप्त झाले आहे. शहरातील शिल्लक रस्ते व नाली बांधकामाचे नियोजन करण्यात आले असून, निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. निधी प्राप्त होताच ही कामे करण्यात येणार आहेत. नळ योजनेचे पाणी शहरातील काही वाॅर्डांतच पोहोचत आहे. सुधारित पाणीपुरवठा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. ४० लाख रुपये किमतीचा घनकचरा व्यवस्थापनाचा वणी-यवतमाळ रोडवर खापरी ग्रामपंचायतच्या हद्दीतील जागेवरील प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहराचा चेहरा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.