घरपोच सिलिंडरच्या नावाखाली ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:48 AM2021-09-23T04:48:26+5:302021-09-23T04:48:26+5:30
सध्यस्थितीत घरगुती गॅस सिलिंडर ९४१ या दराने मिळत आहेत. गॅस सिलिंडरचे दर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायचा ...
सध्यस्थितीत घरगुती गॅस सिलिंडर ९४१ या दराने मिळत आहेत. गॅस सिलिंडरचे दर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायचा काय, असा सवालही गृहिणी विचारत आहेत. त्यातच घरपोच सिलिंडर उपलब्ध करून देणाऱ्याकडून २० किंवा त्यापेक्षा जास्त रुपये मागितले जातात. एकीकडे सबसिडीही घटली आहे. वर्षभरात गॅस सिलिंडरच्या दरात ४७० पेक्षा जास्त रुपयांनी दरवाढ झाली आहे. गत वर्षभराच्या सिलिंडरच्या दराबाबत अवलोकन केले असता ४७० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ग्राहक घरबसल्याच ऑनलाईन सिलिंडर बुकिंग करीत असतात. घरपोच सिलिंडर आल्यानंतर कोणी १० रूपये तर कुणी १५, तर कुणी २० रूपये देत असतात. डिलिव्हरी बॉयसुद्धा पैशाची मागणी करीत असतात. कोणी स्वखुशीने तर कोणी नाइलाजास्तव पैसे देत असल्याचे सांगतात. मात्र हे वेगळे पैसे कशाला, असा सवालही आता उपस्थित होत आहे.