अमितेश बोदडेच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राला रोलबॉलचे सुवर्ण
By admin | Published: February 14, 2017 01:39 AM2017-02-14T01:39:59+5:302017-02-14T01:39:59+5:30
बालेवाडी पुणे येथे ६२ वी राष्ट्रीय शालेय रोलबॉल स्पर्धा घेण्यात आली. यात महाराष्ट्र संघाला येथील अमितेश रूपेशराव बोदडे याच्या नेतृत्त्वात सुवर्ण पदक प्राप्त झाले.
यवतमाळ : बालेवाडी पुणे येथे ६२ वी राष्ट्रीय शालेय रोलबॉल स्पर्धा घेण्यात आली. यात महाराष्ट्र संघाला येथील अमितेश रूपेशराव बोदडे याच्या नेतृत्त्वात सुवर्ण पदक प्राप्त झाले. त्याने १४ वर्षे वयोगटात महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषविले.
दहाव्या व अकराव्या सबज्युनिअर रोलबॉल चॅम्पियन स्पर्धेत त्याने प्रतिनिधित्व केले होते. यातूनच उदयपूर (राजस्थान) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला नव जयहिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनायकराव बोदडे, जयहिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वानखडे, कैलास शिंदे, अमोल बोदडे, डॉ. विकास टोणे, प्रा. सुभाष डोंगरे, स्कूल आॅफ स्कॉलर्सचे प्राचार्य नरेंद्रसिंग चौहान, संजय कोल्हे, महेश गहुकार, प्रताप पगार, दादा भोरे, राहुल जोशी, प्रभाकर बडेराव, रोहन दाभाडे आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल अमितेश बोदडे याचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. (वार्ताहर)