नॅक मूल्यांकनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:40 AM2021-04-15T04:40:08+5:302021-04-15T04:40:08+5:30
येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयात आयक्यूएसीच्यावतीने ‘रोल ऑफ नॉन-टिचिंग इन नॅक अँक्रिडिटेशन’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन ...
येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयात आयक्यूएसीच्यावतीने ‘रोल ऑफ नॉन-टिचिंग इन नॅक अँक्रिडिटेशन’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. बी. राऊत होते. विद्याप्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. संगीता घुईखेडकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. डॉ. राजपूत यांनी विविध उदाहरणाद्वारे मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. उत्तरार्धात बाभूळगाव येथील शिवशक्ती महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. संजय शेणमारे यांनी कार्यशाळेबद्दल अभिप्राय नोंदविला. कार्यशाळेत विविध राज्यांतील ५० पेक्षा जास्त प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. संचालन राष्ट्रीय कार्यशाळेचे निमंत्रक आणि आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. प्रशांत बागेश्वर, तर आभार डॉ. अमोल वाकोडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. एस. बी. चकवे, डॉ. वाकोडे, डॉ. भागवत आदींसह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.