मुळावात लोकसहभागातून बंधारा
By admin | Published: April 13, 2017 01:17 AM2017-04-13T01:17:07+5:302017-04-13T01:17:07+5:30
दरवर्षी मुळावा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण होते. यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून
वॉटर कप स्पर्धा : पाणी फाऊंडेशन राबविणार विविध उपक्रम
मुळावा : दरवर्षी मुळावा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण होते. यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ बंधारा बांधण्यात येणार आहे. सलग ४५ दिवस हा उपक्रम चालणार असून पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कपमध्ये या माध्यमातून गावकऱ्यांनी प्रवेश केला आहे.
मुळावा या गावात कायम पाणीटंचाई असते. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेत शोषखड्डे, बंधारे, फार्म बंडींग, कंटूर बंडींग, छोटे मातीचे बांध, नाला खोलीकरण आदी कामे करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती फाऊंडेशनचे आदिनाथ बडे, उदय खेडकर यांनी दिली.
सभेला जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, सरपंच प्रवीण खडसे, पंचायत समिती सदस्य प्रज्ञानंद खडसे, उपसरपंच रावते, पंचायत समितीचे माजी सदस्य रामराव जामकर, दुर्गा श्यामसुंदर, सुनील बरडे, राजेंद्र खडसे, विजयश्री बरडे, ग्रामविकास अधिकारी सी.टी. पंडितकर, जावेद मुल्ला, बाबा कान्हेड, शारदा जाधव अ. गफ्फार उपस्थित होते. (वार्ताहर)