‘झेडपी’ कर्मचाऱ्यांना साडेचार कोटी रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:19 PM2018-01-06T23:19:15+5:302018-01-06T23:19:26+5:30
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कल्याण निधी योजना बंद झाल्याने जमा निधीतून सदस्यांना शनिवारपासून दीड पटीने रक्कम वाटपास सुरूवात झाली. सदस्यांना जवळपास साडेचार कोटी रूपये मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कल्याण निधी योजना बंद झाल्याने जमा निधीतून सदस्यांना शनिवारपासून दीड पटीने रक्कम वाटपास सुरूवात झाली. सदस्यांना जवळपास साडेचार कोटी रूपये मिळणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी कल्याण निधी योजना सुरू होती. यात दरमहा कर्मचाऱ्यांकडून रक्कम कपात केली जात होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांना तीन पट रक्कम परत दिली जात होती. गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेली ही योजना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला यांच्या निर्णयामुळे बंद पडली. यामुळे कर्मचारी संतापले होते. अनेकांनी योजना सुरू ठेवण्याची मागणी केली होती.
या निधीत गेल्या दोन वर्षांपासून चार कोटी ६४ लाख रूपये पडून होते. ते सदस्यांना परत देण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने जिल्हा परिषद अध्यक्षांना अहवाल दिला. त्यानुसार आता सुमारे तीन हजार ७४२ सदस्यांना त्यांच्या जमा रकमेच्या दीडपट निधी परत दिला जात आहे. शनिवारी सर्व विभाग प्रमुखांच्या नावे एकत्रित धनादेश दिले गेले. ते संबंधित कर्मचाºयांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
सेवानिवृत्तांना फटका
निवृत्तीनंतर तीन पट मिळणारी रक्कम केवळ दीडपटीवर आली. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचाºयांना दीडपटींचा फटका बसला. यामुळे अनेक सेवानिवृत्त न्यायालयात धाव घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.