कीटकनाशकांची उलाढाल ४७५ कोटी रुपयांवर, यवतमाळ जिल्ह्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 02:35 AM2017-11-01T02:35:27+5:302017-11-01T02:36:13+5:30

पिकावर फवारण्यात येणा-या कीटकनाशकांची एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील वार्षिक उलाढाल ४७५ कोटींवर असल्याची माहिती पुढे आली आहे.

Rs. 475 crore turnover of pesticides, pictures in Yavatmal district | कीटकनाशकांची उलाढाल ४७५ कोटी रुपयांवर, यवतमाळ जिल्ह्यातील चित्र

कीटकनाशकांची उलाढाल ४७५ कोटी रुपयांवर, यवतमाळ जिल्ह्यातील चित्र

Next

- राजेश निस्ताने

यवतमाळ : पिकावर फवारण्यात येणा-या कीटकनाशकांची एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील वार्षिक उलाढाल ४७५ कोटींवर असल्याची माहिती पुढे आली आहे.
फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतक-यांचा मृत्यू झाल्यानंतर यवतमाळमधील पीक पद्धतीची देशभर चर्चा होऊ लागली आहे. आतापर्यंत ७०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या ‘एसआयटी’चा सोमवारी जिल्ह्यात दौरा झाला. कीटकनाशक, तणनाशक व बुरशीनाशकाचा बेसुमार वापर होतो. यातील अर्धा वाटा हा तणनाशकाचा आहे. त्यातही विदेशी कंपनीच्या औषधांची सर्वाधिक विक्री आणि बदनामी मात्र देशी कंपनीच्या औषधांची, असे चित्र पाहायला मिळते. यांचे दर प्रतिकिलो-लीटर ३८० रुपयांपासून ८४०० रुपयांपर्यंत आहेत.
कृषी विभागाने एका कंपनीच्या कीटकनाशकाचे १०७ नमुने घेतले होते. त्यापैकी तीन फेल निघाले. बीटी बियाणे असूनही पिकांवर किडींचे प्रचंड आक्रमण होत असल्याने शेतकºयांचा कल जहाल कीटकनाशकांकडे असतो. त्यामुळे विषाक्त शेती होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

शेतमजुरांची प्रचंड टंचाई
ग्रामीण भागात शेतमजुरांची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे तणनाशकाचा बेसुमार वापर होतो. अलीकडेच जिल्ह्यात दौºयावर येऊन गेलेल्या ‘केंद्रीय कीटकनाशक बोर्ड फरिदाबाद’च्या चमूनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. वास्तविक पडीक जमिनीवरच तणनाशक फवारावे, असा नियम आहे. तो झुगारून खुलेआम होणाºया फवारणीमुळे जमीन नापीक होण्याचा धोका दिसू लागला आहे.

Web Title: Rs. 475 crore turnover of pesticides, pictures in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी