शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:05 PM2018-06-02T22:05:47+5:302018-06-02T22:05:47+5:30

खासगी शाळांवरील शिक्षकांना नव्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी मिळवण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले. त्यामुळे नोकरी वाचविण्यासाठी या शिक्षकांची धडपड सुरू आहे. तालुक्यात कॉन्व्हेंट, सीबीएससी, संस्था मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे विद्यार्थी संख्येचा प्रश्न बिकट झाला आहे.

Runners for teachers' students | शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी धावपळ

शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी धावपळ

Next
ठळक मुद्देतुकडी रद्दचा धोका : विद्यार्थी व पालकांना सुविधांचे आमिष

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : खासगी शाळांवरील शिक्षकांना नव्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी मिळवण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले. त्यामुळे नोकरी वाचविण्यासाठी या शिक्षकांची धडपड सुरू आहे.
तालुक्यात कॉन्व्हेंट, सीबीएससी, संस्था मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे विद्यार्थी संख्येचा प्रश्न बिकट झाला आहे. शाळा जास्त व विद्यार्थी कमी, असे उलट चित्र पहावयास मिळत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्यासाठी शाळेकडून वेगवेगळे फंडे वापरण्यात येत आहे. जून महिन्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असून या सत्रामध्ये नवीन विद्यार्थी मिळवण्याचे टार्गेट व्यवस्थापनाने शिक्षकांना दिले आहे. त्यामुळे शिक्षकांची सध्या शहरी भागासह ग्रामीण भागात विद्यार्थी शोध मोहीम सुरु आहे.
खासगी शाळांतील शिक्षकांसमोर नोकरी टिकवून ठेवण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. हे शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात त्यांच्या घरोघरी जाऊन पालकांची मनधरणी करीत आहे. एका तुकडीत नियमाप्रमाणे पटसंख्या नसल्यास, ती तुकडी रद्द केली जाते. त्यामुळे शिक्षक अतिरिक ठरतात. परिणामी तुकडी व अपली नोकरी वाचविण्याकरिता शिक्षकांना विद्यार्थी संख्येचा भरणा करण्याशिवाय पर्याय नाही. सध्या कॉन्व्हेंट व सीबीएससी पॅटर्नमुळे खासगी शाळांमध्ये विद्यार्थी मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे.
अनेक शाळांचे शिक्षक विद्यार्थी व त्यांच्या पालकांना गणवेश, पुस्तके, वाहन व्यवस्था अशी आमिषे दाखवून आपल्या शाळेत विद्यार्थ्याचे नाव दाखल करा, अशी विनवणी करीत आहे. संस्था चालकांकडून वारंवार सूचना होत असल्याने शिक्षकांना विद्यार्थी मिळवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यासाठी त्यांची सतत पायपीट सुरू आहे. तरीही विद्यार्थी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे या शिक्षकांना भविष्याची चिंता सतावू लागली आहे.
सुटीचा आनंद लुटणे कठीण
उन्हाळ्यात दोन महिने सुट्या असतात. मात्र गासगी शाळांमदील शिक्षकांना सुटीचा आनंद ोणेही दुरापास्त झाले आहे. आपल्या शाळेतील तुकड्या वाचविण्यासाठी शिक्षकांना भर उन्हात फिरावे लागत आहे. जादा विद्यार्थी मिळविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. शहरातील शिक्षक खेड्यापाड्यात फिरुन विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. मात्र अनेकांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे.

Web Title: Runners for teachers' students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक