पुसदच्या ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:44 AM2021-04-23T04:44:30+5:302021-04-23T04:44:30+5:30
शहर व तालुक्यात २० दिवसांत बाराशेच्यावर रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाच्या ...
शहर व तालुक्यात २० दिवसांत बाराशेच्यावर रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाने विळखा घट्ट केला आहे. तालुक्यातील माळपठार परिसरात तसेच तांडे, वस्त्यांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. एवढे रुग्ण सापडूनही येथील प्रशासन कोणतीही ठोस भूमिका वठवत नसल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे.
आता शहर व तालुक्यात गल्लोगल्ली वाडी, वस्ती, तांड्यांवर कोरोनाचे रुग्ण आढळत आहे; परंतु कुठेही प्रतिबंधित क्षेत्र नाही. ज्या कुटुंबात बाधीत रुग्ण सापडले, तेथे कुणालाही क्वारंर्टाईन केले जात नाही. बाधीत रुग्ण व त्यांचे कुटुंबीय सर्रास गावात फिरत आहेत. याबाबत कोणतीही कारवाई होत नाही. खासगी रुग्णालयात दुसऱ्या आजाराच्या नावाने काहीजण उपचार घेत आहेत. ते घरीच थांबत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील कोविड सेंटरमध्ये बेड शिल्लक नाही. रेमडेसिविर, ऑक्सिजन व लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.