बारावीच्या निकालात ग्रामीण भागाची बाजी

By admin | Published: May 26, 2016 12:04 AM2016-05-26T00:04:31+5:302016-05-26T00:04:31+5:30

बारावीच्या परीक्षेत शहरी विद्यार्थ्यांसोबतच ग्रामीण विद्यार्थ्यांनीही बाजी मारल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील शाळांचा निकाल उत्कृष्ट लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Rural Happiness in Class XII Examination | बारावीच्या निकालात ग्रामीण भागाची बाजी

बारावीच्या निकालात ग्रामीण भागाची बाजी

Next

घाटंजीचा निकाल ८१.८२ टक्के : राळेगाव, कळंब, आर्णी, दारव्हा, नेर, बाभूळगावमध्ये निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड
यवतमाळ : बारावीच्या परीक्षेत शहरी विद्यार्थ्यांसोबतच ग्रामीण विद्यार्थ्यांनीही बाजी मारल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील शाळांचा निकाल उत्कृष्ट लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.
घाटंजी : येथील श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाने १०० टक्के निकाल देत तालुक्यातील अव्वल स्थान प्राप्त केले. तर पार्डी येथील शिवराम मोघे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७.१४ टक्के लागला आहे.
तालुक्यातून १ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ हजार ३९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८१.८२ एवढी आहे. पुनर्परीक्षार्थी ७३ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ४३.८४ आहे. दोन्ही मिळून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८०.५७ एवढी आहे. निकाल पुढील प्रमाणे : एसपीएम विद्यालय घाटंजी ९४.७४ टक्के, बा.दे. विद्यालय पारवा ९४.५०, शासकीय आश्रमशाळा जांब ९४.३२, स्वामी महाविद्यालय शिवणी ९१.३८, एसपीएम महाविद्यालय घाटंजी ९०.९१, एसपीएम आर्ट व कॉमर्स कॉलेज ७४.८६, बा.दे. महाविद्यालय पारवा ८०.६३, विवेकानंद महाविद्यालय पांढुर्णा ८२.०५, के.जी. सिद्धू महाविद्यालय राजूरवाडी ८१.७०, मंजी नाईक महाविद्यालय किन्ही ७९.७३, शामाप्रसाद मुखर्जी कनिष्ठ महाविद्यालय घोटी ८४.८१, प्रेमसिंग राठोड कनिष्ठ महाविद्यालय मोवाडा ८० टक्के, बा.दे. उच्च माध्यमिक विद्यालय कुर्ली ७२.२२, जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा खापरी ६८.६९, संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय सावरगाव ७७.७८, गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय कोठी ६२.९६, एस. पाटील निकोडे कनिष्ठ महाविद्यालय पार्डी(न) ८८.३७, आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय ताडसावळी ६२.८६, शिवाजी महाराज उच्च माध्यमिक विद्यालय घाटी ८१.८२, ए.एम. पटेल उर्दू कनिष्ठ महाविद्यालय चिखलवर्धा ६३.१६, एसपीएम गिलाणी कला व कॉमर्स महाविद्यालय घाटंजी ७६.८३ टक्के. (तालुका प्रतिनिधी)

दारव्हा तालुक्यातील १४६९ विद्यार्थी उत्तीर्ण
दारव्हा : तालुक्यातील १ हजार ८०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ८१.६१ एवढी आहे. खोपडी येथील महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेले सर्व ३६ विद्यार्थी यशस्वी झाले. निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल असा आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालय दारव्हा ९८.४० टक्के, जिल्हा परिषद माजी शासकीय उर्दू कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा ८१.२५, मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा ८२.८६, टागोर विद्या मंदिर बोरीअरब ६६.६७, जिल्हा परिषद हायस्कूल लोही ९४.१२, जिजामाता कन्या विद्यालय दारव्हा ७८.८, कन्या विद्यालय बोरीअरब ६९.३५, डॉ. अल्लामा इकबाल उर्दू ज्युनिअर कॉलेज लाडखेड ४६.६७, अ‍ॅड. शंकरराव राठोड हायस्कूल लाखखिंड ८९.१८, एमएन उर्दू ज्युनिअर कॉलेज दारव्हा ८७.८८, घेरवरा विद्यालय दारव्हा ९६.३०, मधुजी बुवा कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव (देशमुख) ६२.५०, विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय बोदेगाव ८५.२९, इंदिराबाई पाटील उच्च माध्यमिक विद्यालय सायखेड ७७.१४, स्वा. सावरकर कनिष्ठ महाविद्यालय भुलाई ७७.३६, भुराजी महाराज माध्यमिक विद्यालय महातोली ५१.६१, वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय लाडखेड ५८.३३, दुधे उच्च माध्यमिक विद्यालय महागाव ८९.३६, वसंत विमुक्त जाती उच्च माध्यमिक आश्रमशाळा हरू ७९.३५, उच्च माध्यमिक विद्यालय तरनोळी ७३.३३ टक्के, डॉ. एन.डी. चव्हाण विजाभज कनिष्ठ महाविद्यालय पिंपळखुटा ६९.२३, मुंगसाजी महाविद्यालय धामणगाव (देव) ८७.२३, शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा ४४.१२, मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा ७४.१९, जिजामाता कन्या कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा ८२, इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा ३० टक्के. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rural Happiness in Class XII Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.