सदाभाऊंच्या सरबत्तीने वळली बोबडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 10:05 PM2017-10-04T22:05:13+5:302017-10-04T22:05:24+5:30
फवारणीमुळे विषबाधित शेतकºयांच्या भेटीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोणबेहळच्या ग्रामस्थांना विचारलेल्या प्रश्नांवरून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाºयांची बोबडी वळली.
राजू राठोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणबेहळ : फवारणीमुळे विषबाधित शेतकºयांच्या भेटीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोणबेहळच्या ग्रामस्थांना विचारलेल्या प्रश्नांवरून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाºयांची बोबडी वळली. कृषी सहायकाला ओळखता काय, तो नियमित गावात येतो काय, असे प्रश्न विचारून त्यांनी कर्मचाºयांची पंचाईत केली. सारवासारव करण्याचा अधिकाºयांचा प्रयत्नही गावकºयांनी हाणून पाडला.
सदाभाऊ खोत यांचा ताफा दुपारी लोणबेहळमध्ये धडकला. येथील फाट्यावर एका कॉप्लेक्समध्ये त्यांनी थोडावेळ ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यात ग्रामस्थांनी लोडशेडींग, रस्ते, आॅनलाईन आदी समस्या मांडल्या. नंतर त्यांचा ताफा शेंदुरसनीकडे वळला. तेथे फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या दीपक शामराव मडावी यांच्या घरी त्यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यांच्या शेताची पाहणी केली. नंतर पुन्हा त्यांचा ताफा परत थेट लोणबेहळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात धडकला. तेथे त्यांनी विषबाधेने कुणी दाखल आहे का, याची पाहणी केली. नंतर ते येथील ग्रामपंचायतीत पोहोचले.
ग्रामपांयतीत त्यांनी छोटेखानी बैठक घेतली. यावेळी पूर्ण यंत्रणा उपस्थित होती. खोत यांनी उपस्थितांना तुम्ही कृषी सहायकाला ओळखता का, असा थेट प्रश्न केला. त्यावर एकाने ‘हो’ असे उत्तर दिले. मात्र ते खोत यांना रूचलेही नाही अन् पचलेही नाही, हे त्यांच्या चेहºयावरून स्पष्टपणे जाणवत होते. त्याचवेळी त्यांनी तेथून गावातील रंजनाबाई भगत यांच्या घरी शौचालयाचे भूमिपूजन करण्यासाठी प्रस्थान केले. रस्त्याने जाताना-येताना त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यावेळी मात्र त्यांना खरे उत्तर मिळाले. ग्रामस्थांनी त्यांना चक्क कृषी सहायकाला ओखळत नाही म्हणून सांगून टाकले. त्यांना कधी पाहिले नाही, त्यांचे नावही माहिती नाही, ते कधी येतही नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
कृषी सहायक गावात येतच नसल्याचे कळताच खोत यांनी तलाठ्याबाबत विचारपूस केली. त्यांच्याबद्दलही ग्रामस्थांनी तीच माहिती दिली. नंतर ग्रामसेवकाला याची रजिस्टरमध्ये नोंद घेता का, अशी विचारणा केली. ग्रामसेवकाने असे कोणतेच रजिस्टर नसल्याचे सांगून टाकले. त्यामुळे खोत यांचा पारा भडकला. त्यांनी अखेर तालुका कृषी अधिकाºयांना रोजनिशी दाखविण्याचे निर्देश दिले. मात्र कृषी अधिकाºयाजवळ रोजनिशीच नव्हती. ती घरी विसरल्याचे त्यांनी ठोकून दिले. यावरून सर्व प्रकार खोत यांच्या लक्षात आला. त्यांनी तहसीलदारांना या सर्व प्रकाराबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हा अहवाल ग्रामविकास विभागाला पाठविला जाणार असून कृषी विभागाशी संबंधित कर्मचाºयांवर थेट कृषी राज्यमंत्री खोत कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली.
ग्रामपंचायतीत रजिस्टर ठेवा
यापुढे ग्रामपंचायतीत रजिस्टर ठेवून त्यात गावात येणाºया कर्मचाºयांच्या नोंदी ठेवा, असे निर्देश कृषी राज्यमंत्री खोत यांनी दिले. कृषी सहायक, तलाठी यांच्या भेटीचे दिवस निश्चित करा. ते त्यानुसार येतात का, याची नोंद ठेवा, असेही त्यांनी बजावले. खोत यांच्या आगळ्यावेगळ्या दौºयाने कर्मचाºयांमध्ये धडकी भरली आहे. त्यापैकी कुणावर कारवाईची कुºहाड कोसळते, याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.