मोबदल्यासाठी एसडीओंची खुर्ची जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:12 PM2018-11-19T22:12:11+5:302018-11-19T22:12:37+5:30

येथील एमआयडीसीकरिता पांगरी शिवारातील शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात आले. मात्र १९९५ पासून मोबदल्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांची परवड सुरू आहे. यवतमाळ दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून दोन शेतकºयांनी यवतमाळ उपविभागीय कार्यालयात सोमवारी दुपारी जप्तीची कारवाई केली.

Saddening of SDOs for reciprocity | मोबदल्यासाठी एसडीओंची खुर्ची जप्त

मोबदल्यासाठी एसडीओंची खुर्ची जप्त

Next
ठळक मुद्देदीड कोटीची थकबाकी : ‘एमआयडीसी’साठी २३ वर्षांपूर्वी शेतजमिनीचे संपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील एमआयडीसीकरिता पांगरी शिवारातील शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात आले. मात्र १९९५ पासून मोबदल्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांची परवड सुरू आहे. यवतमाळ दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून दोन शेतकºयांनी यवतमाळ उपविभागीय कार्यालयात सोमवारी दुपारी जप्तीची कारवाई केली. यावेळी एसडीओंची खुर्ची व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
श्रीराम शिरभाते यांची दोन हेक्टर ४२ आर जमीन संपादित केली. त्याचे ५३ लाख २३ हजार रुपये शासनाने दिले नाही. तर अरूण शिरभाते यांच्या ६ हेक्टर ७७ आर जमिनीचा एक कोटी २९ लाख रुपये मोबदला थकविला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर एसडीओ व एमआयाडीसीने सलग दोन वेळा मुदतवाढ मागितली. २०१५ पासून सारखी टोलवाटोलवी सुरू आहे. आताही वेळेत निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी व एमआयडीसी कार्यालयावरही न्यायालयाच्या परवानगीने कारवाई करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
प्रातिनिधिक स्वरूपात खुर्ची जप्त करून लवकरात लकवर मोबदल्याची मागणी शेतकºयांनी केली. यावेळी बेलीफ अनिल निकम उपस्थित
होते.

Web Title: Saddening of SDOs for reciprocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.