सद्धम्म मंगलमैत्री रॅली व धम्म प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:39 AM2017-11-06T00:39:36+5:302017-11-06T00:39:48+5:30
सद्धम्म प्रचार केंद्र लोहारा शाखेतर्फे पाच दिवसीय ध्यान साधना धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्यात आले. या अंतर्गत सद्धम्म मंगलमैत्री रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सद्धम्म प्रचार केंद्र लोहारा शाखेतर्फे पाच दिवसीय ध्यान साधना धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्यात आले. या अंतर्गत सद्धम्म मंगलमैत्री रॅली काढण्यात आली. येथील सत्यसाई क्रीडारंजन सभागृहात आयोजित शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सद्धम्म प्रचार केंद्राचे मुख्य प्रवर्तक बी.सी. वानखडे, ज्येष्ठ सहआचार्य पी.यू. लोखंडे, प्रा. बी.के. गायकवाड, अविनाश बनसोड, अनिल कांबळे, ढोणे आदी लाभले होते.
शिबिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथावर मार्गदर्शन झाले. अंधश्रद्धा निर्मूलनावर सप्रात्यक्षिक जादूचे प्रयोग दाखविण्यात आले. समारोपीय कार्यक्रम प्रा. बी.के. गायकवाड यांच्या अध्यक्षतेत झाला. तत्पूर्वी मंगल मैत्री रॅली काढण्यात आली. लुम्बिनी बौद्ध विहारात बुद्ध वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
धम्मग्रंथावर आधारित धम्मज्ञान स्पर्धा परीक्षेतील विजेते व धम्मज्ञान शब्दकोडे विजेत्यांना केंद्राचे सहआचार्य लोखंडे, प्रा. गायकवाड व अविनाश बनसोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण झाले. संचालन अविनाश बनसोड, तर आभार अनिल कांबळे यांनी मानले. कार्यक्रमांसाठी गुलाब नेवरे, आनंद गवई, दीक्षांत भगत, नीलेश गायकवाड, चेतन दवने, कैलास गोंडाणे, राजू घरडे, आकाश कांबळे, धीरज खोब्रागडे, विलास गोंडाणे, आकाश लोणारे, मोंटू लिहितकर, शारदा जगताप, कांचन भगत, मोना चारव्हे, राज गजभिये, गडलिंग, धनराज धवने, खोब्रागडे यांचे सहकार्य लाभले.