सहस्त्रकुंड धबधबा प्रतिबंधित क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:39+5:302021-07-24T04:24:39+5:30
ढाणकी : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. येत्या १ ...
ढाणकी : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. येत्या १ ऑगस्टपर्यंत तेथे कुणालाही जात येणार नाही.
मागील दोन दिवसांपासून परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. परिसरातील सर्व जल प्रकल्प, नदी, नाले, धरणे ओवर फ्लो होत आहे. मुसळधार पावासामुळे सहस्त्रकुंड धबधबा खळाळून वाहत आहे. यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. काही दिवसापूर्वी सहस्त्रकुंड येथे पती, पत्नी वाहून गेले होते. सेल्फीच्या नादात दरवर्षी येथे बळी जातात.
आता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा आदेश काढून सहस्त्रकुंड धबधबा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. आता येत्या १ ऑगस्टपर्यंत कोणत्याही व्यक्तीला सहस्त्रकुंडला भेट देता येणार नाही. जे व्यक्ती आदेशाचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.
230721\img-20210723-wa0022.jpg
सहस्त्रकुंड धबधबा प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून घोषित. सहस्त्रकुंड धबधब्या ने रुद्ररूप धारण केले