साहेब, पुनर्गठण नको, कर्जमाफी द्या

By admin | Published: June 4, 2016 02:06 AM2016-06-04T02:06:20+5:302016-06-04T02:06:20+5:30

साहेब, कर्ज पुनर्गठण नको, आता केवळ कर्जमाफीच द्या, अशा शब्दात जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा

Saheb, do not reorganize, give debt forgiveness | साहेब, पुनर्गठण नको, कर्जमाफी द्या

साहेब, पुनर्गठण नको, कर्जमाफी द्या

Next

केंद्रीय पथक जिल्ह्यात : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, वाळलेल्या बागेची पाहणी
यवतमाळ : साहेब, कर्ज पुनर्गठण नको, आता केवळ कर्जमाफीच द्या, अशा शब्दात जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा दिल्लीहून दाखल झालेल्या केंद्रीय पथकापुढे व्यक्त केली. या पथकाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत जिल्ह्यातील दुष्काळाचे दाहक वास्तव जवळून अनुभवले.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य डॉ. रामनंद यादव यांच्या नेतृत्वातील केंद्रीय पथकाने शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली. गुरुवारीच पथक यवतमाळात येणार होते. मात्र एक दिवस उशिराने सदर पथक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी यवतमाळ तालुक्यातील भारी आणि कळंब तालुक्यातील चापर्डा गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. इतकेच नव्हे तर वाळलेल्या फळ बागांची पाहणी या पथकाने केली.
बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाही, मिळालेले कर्ज कमी पडते, महागाईत बियाणे आणि खतांची खरेदी अशक्य आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाण्यांचे पॅकेज मिळेल तर लाभदायक राहील, असे सांगितले. पीक विम्याची मदत कर्जात कापल्या जात असल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. या पथकासमोर सिंचन, कालव्याचे अर्धवट काम, कृषी पंपावरील भारनियमन आदी समस्या मांडल्या. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देण्याची मागणी करण्यात आली. या पथकाने चापर्डा येथे एका झाडाखाली सभा घेतली. त्यानंतर अशोक कांबळे आणि सुभाष सरोदे यांच्या वाळलेल्या सत्रा बागेची पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळाचे वास्तव अनुभवून पथकातील सदस्यही अस्वस्थ झाले होते. हा अहवाल पथक केंद्र सरकारला सादर करेल, त्यानंतर मदतीची अपेक्षा आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Saheb, do not reorganize, give debt forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.