साहेब, आम्हाला चोर समजता काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 09:18 PM2018-01-25T21:18:18+5:302018-01-25T21:18:49+5:30

Saheb, do you think we're a thief? | साहेब, आम्हाला चोर समजता काय ?

साहेब, आम्हाला चोर समजता काय ?

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : तूर खरेदी प्रकरणात घाटंजीतील ३०८ जणांना नोटीस

घाटंजी : साहेब, आम्ही शेतकरी आहोत. आम्हाला चोर समजता काय ?, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी नाफेड तूर खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेल्या पथकाला केला. शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून चौकशी अधिकाऱ्यांनी आम्ही वरिष्ठांचे आदेश पार पाडत आहोत, असे सांगत आपली सुटका करून घेतली. घाटंजी बाजार समितीत तूर खरेदी प्रकरणी ३०८ शेतकऱ्यांना नोटीस दिल्याने तालुक्यात असंतोष पसरला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गतवर्षी शासनाने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी केली. या खरेदीत गैरप्रकार झाला असून प्रतीक्षा यादीत नावे नसणाºया शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. ही तूर शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची याची चौकशी होईपर्यंत देयके थांबवावी अशी तक्रार बाजार समितीचे माजी संचालक सैयद रफीक स.महेमुद यांनी ६ सप्टेबर २०१७ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीवरून चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय पथक गुरुवारी येथील बाजार समितीत आले.
या पथकाने ३०८ शेतकऱ्यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्या होत्या. पथकासमोर उपस्थित झालेल्या शेतकऱ्यांनी चौकशी अधिकाºयांवरच प्रश्नांचा भडीमार केला. ‘आम्हाला चोर समजता काय’ अशी आक्रमक भूमिक घेतली. आजची आमची बुडालेली मजुरी, येण्या-जाण्याचा खर्च द्या, नंतर बयाण नोंदवा नाही, तर खर्च तक्रारदारांकडून वसूल करा, आम्हाला नाहक त्रास देऊ नका असे त्यांनी सांगितले. आम्हाला नोटीस देऊन येथे बोलावले, आम्ही आलो, तक्रारकर्ते का आले नाही, असा सवालही यावेळी शेतकºयांनी केला.
शेतकऱ्यांचा संताप पाहून अखेर चौकशी अधिकारीही नरमले. त्यांनी आम्ही केवळ आदेश पाळत असल्याचे सांगून कशीबशी आपली सुटका करवून घेतल्याने अनर्थ टळला.

Web Title: Saheb, do you think we're a thief?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.